उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपने 2022 ची विधानसभा निवडणूक जिंकली काय आणि भारतातल्या लिबरल विद्वतजनांमध्ये राजकीय आणि सामाजिक पोटदुखीची प्रचंड साथ पसरली…!! निवडणुकीचे निकाल लागून तीन दिवस उलटले तरी पोटदुखी थांबायला तयार नाही. electoral Democracy v/s Constitutional Democracy
सर्वसामान्य माणूस पराभूत झाला तर तो दुःखी होतो. त्याला अपयश आले तर तो चिडचिड करतो. पण हा झाला सर्वसामान्य माणसाचा फंडा…!! पण लिबरल विद्वज्जनांचे तसे नसते. ते जर पराभूत झाले, अपयशी ठरले तर ते आधी आपल्या वैयक्तिक दोषांकडे लक्ष देण्यापेक्षा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत त्याची कारणे शोधायला लागतात. आपल्या अपयशाची पाळेमुळे जागतिक – राष्ट्रीय – प्रादेशिक पातळीवर धुंडाळू पाहतात आणि ती सापडलीच तर त्यावर आपली विशिष्ट वैचारिक मखलाशी सुरू करतात. आपल्याच उणीवांमुळे झालेला पराभव ते मान्य करत नाहीत आणि अखेरीस मान्य करावाच लागला तर त्या अपयशावर वेगवेगळे वैचारिक मुलामे चढवायला लागतात.
असेच काहीसे रामचंद्र गुहा आणि आशुतोष वार्ष्णेय यांच्यासारख्या लिबरल विचारवंतांचे झाले आहे. उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपचा झालेला विजय या लिबरल विचारवंतांच्या एवढा जिव्हारी लागला आहे, की तेवढा तो पूर्ण भुईसपाट झालेल्या काँग्रेस नेत्यांच्याही जिव्हारी लागला नसेल…!! या जिव्हारी लागलेल्या पराभवामुळे रामचंद्र गुहा यांनी काँग्रेसला न मागितलेला सल्ला देऊन टाकला. गांधी परिवाराने सक्रिय राजकारणातून निवृत्त व्हावे. जणू काही गांधी परिवार रामचंद्र गुहा हा सल्ला देतात कधी आणि आपण त्या सल्ल्याची अंमलबजावणी करतो कधी!!, याची जणू वाटच पाहत होता. आता रामचंद्र गुहा यांनी सल्ला दिला आहे ना, मग चला त्याची अंमलबजावणी करूनच टाकू, असे म्हणत गांधी परिवाराने आजच काँग्रेस कार्यकारिणीची बैठक जणू बोलावली आहे…!! आणि त्यामध्ये काँग्रेसच्या पराभवापेक्षा रामचंद्र गुहा यांनी गांधी परिवाराला रिटायर होण्याच्या दिलेल्या सल्ल्यावर जास्तीत जास्त “खल” होण्याची शक्यता आहे…!!… हे झाले रामचंद्र गुहांचे.
पण त्यापलिकडे जाऊन आशुतोष वार्ष्णेय या लिबरल विद्वानांनी इंडियन एक्सप्रेस मध्ये लेख लिहून आपली वैचारिक मळमळ बाहेर काढली आहे. चार राज्यांमध्ये भाजपा जिंकला आहे ना… हा “निवडणुकीच्या लोकशाहीचा” (Electoral Democracy) विजय आहे पण प्रत्यक्षात “घटनात्मक लोकशाहीचा” (Constitutional Democracy) पराभव आहे, असा वैचारिक मुलामा त्यांनी भाजपच्या विजयावर आणि काँग्रेससह विरोधी पक्षांच्या पराभव चढवला आहे…!!
भाजप “निवडणुकीच्या लोकशाही”तून सतत जिंकत चालल्याने तो आता “घटनात्मक लोकशाही” पायदळी तुडवायला मोकळा झाला आहे किंबहुना “निवडणुकीच्या लोकशाही”तून “घटनात्मक लोकशाहीला” फार मोठे आव्हान उभे राहिले आहे, असे “उच्च दर्जाचे उच्चशिक्षित उच्च वैचारिक मत” आशुतोष वार्ष्णेय यांनी व्यक्त केले आहे…!!
राज्यघटनेने अल्पसंख्यांकांचे अधिकार सुनिश्चित केले आहेत. भारतासारख्या धर्मनिरपेक्ष देशात घटनादत्त अधिकारांमुळे अल्पसंख्यांक सुरक्षित आहेत. परंतु आता “निवडणुकीच्या लोकशाही”तून विजय प्राप्त झाल्यामुळे भाजप अल्पसंख्यांकांच्या या घटनादत्त अधिकाराला कात्री लावण्यासाठी वेगवेगळे कायदे करून “घटनात्मक लोकशाहीला” धोका निर्माण करत असल्याचा अजब जावईशोध आशुतोष वार्ष्णेय यांनी लावला आहे.
आशुतोष स्पर्शने यांना मूळात “निवडणुकीची लोकशाही” ही घटनेतूनच आली आहे याची कल्पना नाही का…?? पाच राज्यांमध्ये घटनात्मक मार्गानेच निवडणुका झाल्या याची त्यांना कल्पना नाही का…?? चार राज्यांमध्ये जसा भाजपचा प्रचंड विजय झाला तसाच विजय पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचा झाला, हे आशुतोष वार्ष्णेय यांना कळले नाही का…?? मग जर चार राज्यांमध्ये भाजप “निवडणुकीची लोकशाही” जिंकला असेल, तर पाचव्या पंजाब राज्यात आम आदमी पार्टी देखील “निवडणुकीचीच लोकशाही” जिंकली आहे, हे आशुतोष वाटणे यांना मान्य आहे का…??
जर भाजपचा चार राज्यांतला विजय हा “निवडणुकीच्या लोकशाहीचा” विजय असेल तर मग पंजाब मधला आम आदमी पार्टीचा विजय हा देखील “निवडणुकीच्या लोकशाहीचा”च आहे की “घटनात्मक लोकशाहीचा” आहे…?? पंजाब मध्ये आम आदमी पार्टी जिंकली तर “घटनात्मक लोकशाहीला” धोका निर्माण होत नाही… पण भाजपने मात्र निवडणूक जिंकली तर तो “निवडणुकीच्या लोकशाहीचा” विजय होऊन “घटनात्मक लोकशाहीचा” पराभव होतो आणि “घटनात्मक लोकशाहीला” धोका उत्पन्न होतो, असे अजब तर्कट आशुतोष वार्ष्णेय यांनी लावले आहे.
प्रत्यक्षात घटनाकारांनी लोकशाहीत असा कोणताही भेद निर्माण केलेला नसताना “निवडणुकीची लोकशाही” आणि “घटनात्मक लोकशाही” असा भेद निर्माण करण्याचा लिबरल विद्वतजनांचा हा नवा वैचारिक फंडा आहे हेच यातून दिसून येत आहे…!! भाजपच्या विजयाचा पोटदुखीतून तो आला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App