विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी सरकारच्या काळातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदली घोटाळा बाहेर काढणाऱ्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या घरामध्ये पोलीस चौकशी सुरू आहे, तर राज्यभर यामध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी आक्रमक होऊन पोलीस नोटिशीची होळी पेटवली आहे. Fadanavis Police Inquiry: Police interrogation at Devendra Fadnavis’ house; Holi of police notice all over Maharashtra !!
देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशी विरोधात भाजपने राज्यभर जोरदार आंदोलन चालवले आहे. राज्यातल्या प्रत्येक शहरांमध्ये आणि गावांमधून भाजपाचे कार्यकर्ते स्थानिक पातळीवर चौकात जमून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी भाजपची सर्व संघटना एकजुटीने उभी असल्याचे दाखवण्यासाठी पोलिसांच्या नोटिशीची होळी पेटवून ठेवली आहे.
ट्रान्सफर रॅकेट मध्ये पैसे MVA सरकारच्या मंत्र्यांनी कमवायचे. हे उघड केलं म्हणून विरोधी पक्षनेत्यांना नोटीस पाठवायची. मोठ्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, सरकार चालवत आहात की, रंगदारीचा धंदा? #ISupportDevendra pic.twitter.com/wIihbn3MdG — भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 13, 2022
ट्रान्सफर रॅकेट मध्ये पैसे MVA सरकारच्या मंत्र्यांनी कमवायचे. हे उघड केलं म्हणून विरोधी पक्षनेत्यांना नोटीस पाठवायची.
मोठ्या साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री, सरकार चालवत आहात की, रंगदारीचा धंदा? #ISupportDevendra pic.twitter.com/wIihbn3MdG
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 13, 2022
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी पुण्यात भाजप मुख्यालयासमोर पोलीस नोटिशीची होळी केली. यावेळी भाजपच्या हजारो कार्यकर्त्यांनी तिथे ठाकरे – पवार सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
अशाच प्रकारचे आंदोलन सांगली, सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, औरंगाबाद, जालना, सोलापूर, उस्मानाबाद, नागपूर, विदर्भात अमरावती, वाशीम, यवतमाळ आदी शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमध्ये सुरू आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी या प्रत्येक आंदोलनाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीच्या निमित्ताने संपूर्ण भाजप यांच्या बाजूने एकवटल्याचे चित्र निर्माण करण्यात भाजपचे नेते आणि कार्यकर्ते यशस्वी झाले आहेत.
भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील तमाम जनता मा. देवेंद्रजींच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे❗️ pic.twitter.com/Wfunu27V1E — Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 12, 2022
भारतीय जनता पार्टी आणि महाराष्ट्रातील तमाम जनता मा. देवेंद्रजींच्या पाठीशी खंभीरपणे उभी आहे❗️ pic.twitter.com/Wfunu27V1E
— Chandrakant Patil (Modi Ka Parivar) (@ChDadaPatil) March 12, 2022
विस्कळीत राष्ट्रवादीला एकवटण्यासाठी जो राजकीय फंडा शरद पवार यांनी ईडीच्या न आलेल्या नोटीशीचीच्या वेळी वापरला होता, तोच राजकीय फंडा आज भाजपचे कार्यकर्ते देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या घरातच पोलीस चौकशी सुरू असताना राज्यभर वापरताना दिसत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App