नाशिक : मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसची Congress शांत खेळी; ठाकरे + पवारांच्या पक्षांची मात्र उताविळी!!… असले राजकारण महाविकास आघाडीतले घटक पक्षांमध्ये सुरू आहे.
लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीवर मात केल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा हुरूप वाढला. वास्तविक महाविकास आघाडीत काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल ठरला. तो पक्ष तिसऱ्या क्रमांकावरून पहिल्या क्रमांकावर आला, पण माध्यमांमध्ये मात्र चमकोगिरी ठाकरे आणि पवारांच्याच पक्षांनी केली. लोकसभा निवडणुकीत 14 जागा मिळवून फक्त काँग्रेस पक्षच डबल डिलीट मध्ये पोहोचला. उलट भाजप, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना हे तिन्ही पक्ष डबल डिजिट वरून सिंगल डिजिट वर आले. पवार काका – पुतण्यांचे डिजिट बदलण्याचे प्रश्नच नव्हते. कारण मूळात तेवढ्या जागा लढण्याची त्यांची कॅपॅसिटीच नव्हती. त्यानुसार ते फारच मर्यादित जागा लढून 8 व 1 अशा सिंगल डिजिट मध्ये राहिले.
पण असे असले तरी ठाकरे आणि पवारांचे पक्ष मात्र मुख्यमंत्री पदावरून सतत फुरफुरत राहिले. अगदी परवाच्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी जाहीरपणे काँग्रेस आणि शरद पवारांना मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करा, असे जाहीर आवाहन करून आव्हान दिले. पण पवार आणि काँग्रेसचे नेते ठाकरेंपुढे बधले नाहीत.
महाविकास आघाडीतून अशी अप्रत्यक्ष नकारघंटा मिळाली, तरी उद्धव ठाकरेंचे शिलेदार संजय राऊत गप्प बसले नाहीत. त्यांनी काल नागपूरात उद्धव ठाकरे हेच जनतेच्या मनातली मुख्यमंत्री आहेत, असे सांगून टाकले. 2019 मध्ये ते मुख्यमंत्री बनायला आले नव्हते. लोकांनी त्यांना मुख्यमंत्री बनवले. अडीच वर्षे त्यांनी उत्तम सरकार चालविले म्हणून ते जनतेच्या मनातले मुख्यमंत्री बनले, अशी मखलाशी संजय राऊत यांनी केली.
Sharad Pawar : बांगलादेशात जिहादी सत्ता, हिंदूंवर अत्याचार; पवार म्हणाले, महाराष्ट्रात नकोत त्याचे पडसाद!!
पोस्टर्स वरचे भावी मुख्यमंत्री
संजय राऊत यांच्या वक्तव्यावर काँग्रेस Congress आणि पवारांच्या पक्षाने कुठलीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही, पण पवारांच्या पक्षातले नेते मात्र सातत्याने भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टरवर झळकले. सुप्रिया सुळे, जयंत पाटील, रोहित पवार यांच्यासारख्या नेत्यांचे सतत पोस्टर झळकवणे आणि त्यांना पोस्टर वरचे मुख्यमंत्री बनवणे हा पवारांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्त्यांचा लाडका छंद आहे. भले पवारांनी जाहीरपणे यातल्या एकाचेही नाव मुख्यमंत्रीपदासाठी जाहीर केले नाही, तरी पोस्टरवर त्यांची नावे भावी मुख्यमंत्री म्हणून नावे झळकवायला कार्यकर्ते मागेपुढे पाहत नाहीत. दोन्ही राष्ट्रवादींमध्ये ही प्रवृत्ती समान दिसते.
काँग्रेसमधल्या “डबल एम” बढत्या
त्या उलट लोकसभेतला आपला चांगला परफॉर्मन्स टिकवून राहण्याच्या दृष्टीने काँग्रेसने मात्र शांतपणे खेळ्या चालवल्या आहेत. नाना पटोले वगळता माध्यमांमध्ये फारसे कोणी चमकोगिरी करत नाही. उलट परवाच मल्लिकार्जुन खर्गे यांनी महाराष्ट्रातल्या निवडक नेत्यांना बढती देऊन त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणून ठेवले. काँग्रेसची ही गंभीर खेळी आहे. काँग्रेसने बाळासाहेब थोरात यांना काँग्रेस कार्यकारिणीवर घेतले. मुस्लिम नेते नसीम खान यांना कार्यकारणीवरच विशेष निमंत्रित केले आणि दुसरे मुस्लिम नेते मुझफ्फर हुसेन यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष केले. यातून काँग्रेसने शांतपणे मराठा + मुस्लिम असे “डबल एम” कॉम्बिनेशन प्रस्थापित केले. दलित + आदिवासी + मुस्लिम हा काँग्रेसचा निष्ठावंत मतदार यानिमित्ताने अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न यातून काँग्रेसने साधून घेतला.
यात काँग्रेसने कुठेही पोस्टरबाजी केली नाही. नाना पटोले वगळता बाकी कुठल्याचे कुठल्याही नेत्याचे नाव भावी मुख्यमंत्री म्हणून लाडूवर लिहिले नाही किंवा पोस्टरवर झळकवले नाही किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करा असला आग्रह देखील धरला नाही. उलट माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आधी मुख्यमंत्री पदाचा नाव जाहीर करून निवडणूक लढण्याची काँग्रेसची परंपराच नाही, असे उद्धव ठाकरे यांना सौम्य शब्दांत ठणकावून सांगितले. यातून काँग्रेसचे ठाकरे + पवारांपेक्षा राजकारण किती बेरकी आणि मुरलेले आहे, हेच समोर आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more