तेलतुंबडेसारख्या व्यक्तींचा पराभव व पळापळ हीच डॉ.बाबासाहेबांना खरी श्रद्धांजली!!


आज महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती !
बाबासाहेब सांगून गेलेत ‘We are Indians, firstly and lastly.’ आणि याच्या अगदी विरोधात काम करणारी इस्लामी कट्टरवाद्यांची आणि डाव्या नक्षलवाद्यांची युती आपले रंग परत दाखवायला लागली आहे. सुप्रीम कोर्टाकडून सर्व तपास, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अखेर आनंद तेलतुंबडे तुरुंगाच्या दारापर्यंत पोहचला आहे आणि याच्याच विरोधात शहरी नक्षली पेटलेत.  शहरी  नक्षलवाद्याविरुद्धच्या सर्व संघर्षात अग्रणी राहिलेल्या कॅप्टन स्मिता गायकवाड़ यांचा हा लेख फेसबुकवरून साभार…


#standwithanand ? For what ??

आनंद तेलतुंबडे आंबेडकर कुटुंबाचा जावई आहे, हे सांगणाऱ्या पुरोगाम्यांनी तो पन्नास लाखाचं बक्षिस डोक्यावर असणाऱ्या wanted माओवादी मिलिंद तेलतुंबडेचा सख्खा भाऊ आहे हे सांगायला विसरू नका.

केवळ भाऊ असल्याने कोणी माओवादी ठरत नसतो हा तर्क द्यायचा झाल्यास कोणी केवळ जावई असल्याने संविधानवादी किंवा लोकशाहीवादी ठरत नसतो हे पण लक्षात ठेवा …

हातात बंदूक घेवून पोलिसांविरुद्ध लढणाऱ्या आणि पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या माओवादी केंद्रीय समिती सदस्य अनुराधा गांधीच्या लेखांचं संकलन करून संपादित करून त्याचं पुस्तक छापणारा आनंद तेलतुंबडे , गडचिरोली कोर्टाने पुराव्यांवर आधारित जन्मठेपेची शिक्षा सुनावलेल्या माओवादी जी एन साईबाबाच्या समर्थनार्थ उभा राहणारा आनंद तेलतुंबडे , माओवादी म्हणून कोर्टात ज्याच्या विरुद्ध गुन्हे सिद्ध होऊन शिक्षा मिळाली त्या माओवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य असलेल्या भुरट्या देशद्रोही श्रीधर श्रीनिवासनची तुलना भगतसिंगांशी करून त्याचं उदात्तीकरण करणारा आनंद तेलतुंबडे माओवादी असण्याची शक्यता नक्की कशाच्या आधारावर नाकारली जात आहे स्वयंघोषित पुरोगाम्यांकडून ??

जगातला कोणताच कायदा हे सांगत नाही की उच्चशिक्षित लोक दहशतवादी असू शकत नाहीत .. बाकी, कायद्याच्या पळवाटा वापरून जवळ जवळ दोन वर्ष चाललेला लपाछपीचा खेळ पुराव्यांवर आधारित कायदेशीर प्रक्रिया वापरूनच संपत आलाय ह्याची फेसबुकवरच्या स्वयंघोषित कायदेतज्ञांनी नोंद घ्यावी …भिमाच्या कायद्याची ताकद काय असते ते माओवाद्यांनी आता तरी समजून घ्यावं .

लोकशाही आणि संविधान उलथून टाकण्यासाठी सामान्य भारतीयांना वापरण्याचे मनसुबे बाळगणाऱ्या माओवादी मानसिकतेला कायद्यासमोर शरणागती पत्करावी लागते हीच ह्या लोकशाहीची आणि संविधानाची ताकद आहे आणि राहील .

जय भिम !! ‘

त्यामुळे आनंद तेलतुंबडे सारख्या व्यक्तीचा पराभव , पळापळ आणि अपेक्षित असलेली अटक हीच बाबसाहेबांना खरी श्रद्धांजली असेल .

आणि बाबासाहेबांना मानणारा प्रत्येक जण बाबासाहेबांनीच एका ठिकाणी वापरलेल्या विशेषणानुसार एखाद्या जिब्राल्टरप्रमाणे राष्ट्रहित सर्वोपरी मानून देशाच्या बाजूने या अभद्र युतीच्या विरोधात उभा राहील ही खात्री आहे .

जय भीम …
जय हिंद …

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात