का नाही चालणार देशात सावरकर युग आणि गांधी युग एकत्र??; केवळ डावे विचारवंत म्हणतात म्हणून??


भारतात सावरकर युग आणि गांधी युग या विषयावरून वाद सुरू झाला आहे. केंद्रीय माहिती आयुक्त आणि ज्येष्ठ पत्रकार उदय माहुरकर आणि इतिहासकार इरफान हबीब यामध्ये आमने – सामने आले आहेत. या दोन्ही ज्येष्ठ व्यक्तींची हा वैचारिक टक्कर आहे. पण म्हणून देश फक्त आणि फक्त सावरकर विचारांवर किंवा गांधीजींच्या विचारांवरच चालू शकतो असे म्हणणे हा सत्याचा अपलाप आहे. Why Savarkar era and Gandhi era will not work together in the country ??; As only the left thinkers say ??

सावरकर आणि गांधी हे दोन्ही टोकाचे वैचारिक मतभेद असणारे नेते होते ही उघड बाब आहे. ती या दोन्ही नेत्यांनी कधी लपवली नाही. पण म्हणून दोन्ही नेत्यांमध्ये काही समान गोष्टीच नव्हत्या, असे म्हणणे देखील सत्याचा अपलाप करणे आहे. किंबहुना काही बाबतीत सावरकर आणि गांधीजी यांच्या समान होतेच ना…!! देशाला स्वातंत्र्य मिळाले पाहिजे ही दोघांची इच्छा आणि आकांक्षा होती हे स्वीकारलेच पाहिजे. सावरकर हे कट्टर देशभक्त आहेत. इंग्रजी साम्राज्याचे भारतावर होणारे दुष्परिणाम त्यांनी माझ्या आधीपासून ओळखले होते, अशी कबुली गांधीजींनी यंग इंडिया मधल्या आपल्या लेखातून दिली होती. त्याचबरोबर देशात राजकीय जागृती करण्यात महात्मा गांधी यांच्या चळवळीचा मोठा वाटा आहे हे मी मोकळ्या मनाने कबूल करतो, असे सावरकर म्हणाले होते. पण त्यांच्यातील प्रामाणिक वैचारिक मतभेद आज राजकीय आखाड्यातले “मनभेद” बनले आहेत… आणि हेच मुख्य दुखणे आहे…!! डाव्या इतिहासकारांनी सेट केलेला नॅरेटिव्ह हाच फक्त सत्य आहे, असे मानून चालल्यामुळे हे दुखणे तयार झाले आहे. आणि म्हणूनच इरफान हबीब यांचे म्हणणे देशात सावरकर युग आणि गांधी युग हातात हात घालून चालू शकत नाहीत असे आहे.

– देश कुणाचा वैचारिक गुलाम नाही

वास्तविक पाहता कोणताही देश कुणाचा वैचारिक गुलाम असू शकत नाही. देशाच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात विविध टप्पे येत आणि जात असतात. अनेक विचारवंत त्यामध्ये भर घालताना दिसतात. तशी भर गांधीजी आणि सावरकर यांनी आपापल्या राजकीय प्रगल्भतेने नुसार घातली आहे. पण त्याचे रूपांतर राजकीय नेत्यांनी “मनभेदाच्या राजकीय आखाड्यात” केल्यामुळे गांधी युग की सावरकर युग असा प्रश्न उपस्थित केला जातो आहे.

देशाच्या विविध क्षेत्रांचा विचार केला तर संरक्षण धोरण आणि परराष्ट्र धोरण या विषयांमध्ये सावरकर युग आले आहे हे मान्यच करावे लागेल. किंबहुना ते काही आज आलेले सावरकर युग नव्हे. 1962 सालच्या चीन युद्धातील पराभवानंतर देशाच्या संरक्षण धोरणाने सावरकर वादाकडे वाटचाल सुरू केली होती. इंदिरा गांधी यांनी उघडपणे बांगलादेशाची निर्मिती करून सावरकर वादावरच शिक्कामोर्तब केले होते. प्रश्न फक्त तेव्हा नामश्रेय देण्याचा होता. इंदिरा गांधी यांचा वैचारिक वारसा नेहरू-गांधी खानदानाचा होता. त्या आपल्या भूमिकेला सावरकर वादाचे नाव कशा देतील??त्यामुळे सावरकरवाद आजच अवतरला आहे असे म्हणणे देखील एक प्रकारे सत्याचा अपलापच आहे. त्याच बरोबर देशात गांधी युग आणि सावरकर युग हातात हात घालून चालू शकत नाही, असे म्हणणे देखील सत्याचा अपलाप आहे. कारण स्वच्छता अभियानात गांधीजींच्या चष्म्याचा वापर करणे ही प्रतीकात्मकता खरीच आहे. गांधीजी हे सार्वजनिक स्वच्छतेचे प्रणेते होतेच, ही वस्तुस्थिती आहे. सध्याचे सरकार गांधीजींना नामश्रेय देऊन स्वच्छता अभियान चालवते आहे. आत्मनिर्भर भारतातील छोट्या आणि सूक्ष्म उद्योगांना प्राधान्य देणे ग्रामीण भागातील युवकांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे ग्रामीण अर्थव्यवस्थेत आमूलाग्र बदल करणे हा गांधीजींच्या विचारांचा वारसाच पुढे चालविणे आहे. गांधीजींनी चरख्याला यांत्रिक अभियानात परिवर्तीत करायचा प्रयत्न केला होता ही ऐतिहासिक घटना प्रेरणादायीच आहे. तिला नामश्रेय दिलेच पाहिजे.

– राजकीय अट्टाहास का??

पण म्हणून सर्वच देशाच्या सर्व धोरणांमध्ये गांधी युगच असले पाहिजे, हे म्हणणे देखील आपलाच राजकीय अट्टाहास चालविण्याचे द्योतक आहे. देशाच्या संरक्षण धोरणांमध्ये गांधीजींच्या विचारांचा प्रभाव पडू शकत नाही. कारण आंतरराष्ट्रीय परिस्थिती त्या गोष्टीला अनुकूल नाही, हे सांगायला कोणत्याही रॉकेट सायन्सचा अभ्यास करावा लागत नाही. त्याचबरोबर देशाचे परराष्ट्र धोरण देखील मवाळ राहून चालणार नाही. त्यामुळे तिथे देखील फक्त गांधी युगाचा आग्रह धरणे ही धोरणात्मक चूक ठरू शकते.

पण प्रत्येक ठिकाणी फक्त सावरकर युग आणि गांधी युग अशी तुलना करणे देखील अयोग्य आणि अप्रस्तुत आहे. देश कोणाही एका व्यक्तीच्या विचारानुसार चालत नाही. तो व्यक्ती समूहांच्या किंबहुना समुदायाच्या विचारानुसार चालतो ही वस्तुस्थिती आहे. ही वस्तुस्थिती डाव्या विचारवंतांना मान्य नसली तरी ती बदलत नाही. त्यामुळे देशात फक्त सावरकर युग चालेल किंवा गांधी युग चालेल हे म्हणणे आपलाच वैचारिक अट्टाहास रेटून नेण्यापलिकडे दुसरे काहीही नाही…!!

Why Savarkar era and Gandhi era will not work together in the country ??; As only the left thinkers say ??

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती