लाईफ स्किल्स : श्रवण आणि विवेकबुद्धीचा जवळचा संबंध


आकाशवाणी, दूरदर्शन, सिनेमा, नाटक, सभा, व्याख्याने या आपल्या पर्यंत पोहोचणाऱ्या व्यक्त होणाऱ्या माध्यमांमध्ये एकच समान गोष्ट दिसून येते आणि ती म्हणजे, शब्द! उत्तम दर्जाचे शब्द आणि उत्तम श्रवण करणारे श्रोते कायमच समाज उभारणीला हातभार लावत असतात.The close relationship between hearing and conscience

कारण शब्दांत तेवढी ताकद असते आणि उत्तम श्रवण करणाऱ्या व्यक्तीमध्ये, ते शब्द त्याच ताकदीने झेलण्याची क्षमता असते. माणसाच्या एकंदर जीवन प्रवासात त्याला मिळणारा सल्ला त्याच्या आयुष्याला बऱ्याचदा कलाटणी देणारा ठरू शकतो. मिळणाऱ्या सल्याकडे जरा कान देऊन लक्ष देणे महत्वाचे आहे.

येथे श्रवणशक्तीचा संबंध आपल्याला जोडता येतो. कारण, उडत उडत ऐकलेल्या सल्ल्यांचे परिणाम दूरवरच्या प्रवासाला हानी पोहोचवणारे ठरू शकतात. म्हणूनच कानांच्या पट्यात येणाऱ्या सर्वच गोष्टी या प्रत्येकाने ऐकाव्यात. परंतु, त्यातील सार हे आपल्या विवेक शक्तीने पडताळून घ्यावे.

जे व्यर्थ वाटेल ते याच विवेकाच्या तलम गाळणीतून गाळून टाकावे परंतु तेही सोडून देताना त्यातील अपरिपक्वता समजून घ्यावी. बऱ्याच वेळा एखाद्या गोष्टीच्या आत दडलेली नकारात्मकताही समजून घ्यावी लागते, कारण तीच आपल्याला सकारात्मकतेच्या एका पावलाने जवळ करते. श्रवणाचा आणि विवेकबुद्धीचा खूप जवळचा संबंध आहे.

कानांत शिरणाऱ्या प्रत्येक शब्दाचा याच विवेकाच्या सहाय्याने विचार केला जातो आणि आपली प्रतिक्रिया उमटते, व्यक्त किंवा अव्यक्त! मिळणारा प्रत्येक सल्ला हा सुयोग्य असेलच असे नाही किंवा प्रत्येक सल्ला हा लाथाडण्याजोगा असेल असेही नाही. म्हणूनच कुठलीही गोष्ट श्रवण करताना जर ती गोष्ट स्वतः संबंधित असेल तर, त्यातले स्व-उपयोगी काय? याचा अनेकदा विचार करावा, त्यात घेतला जाणारा निर्णय समाज निगडीत असल्यास श्रवण करणाऱ्यास अतीव सतर्क राहणे गरजेचे असते.

असार किंवा अयोग्य सोडून देताना ते का अयोग्य आहे, याचाही विचार व्हायला हवा. एकंदरीत ही सारी किमया श्रवण शक्तीची आहे. श्रवण, ही एक स्वतःत घडवता येण्यासारखी कला आहे असे मानायला हरकत नाही. परंतु ती घडवण्यासाठी लागणारी विवेक बुद्धी देखील तेवढीच महत्वाची.

The close relationship between hearing and conscience

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात