सावरकरांना अपेक्षित हिंदूचे सैनिकीकरण आणि औद्योगिकीकरणही…!!


स्वातंत्र्यवीर सावरकर आणि सैनिकीकरण या मुद्द्यावर साधारणपणे सार्वजनिक पातळीवर चर्चा होते. पण सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणाबरोबरच हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचाही आग्रह धरला होता, याकडे फारसे लक्ष दिले गेलेले दिसत नाही. सावरकर हे सैनिकीकरणाच्या आधीपासून देशाच्या आणि पर्यायाने हिंदूंच्या औद्योगिकीकरणाविषयी आग्रही होते. या दोन महत्त्वाच्या पैलूंवर प्रकाश टाकण्याचा हा प्रयत्न… भाग २ Veer Savarkar; Miltarization and industrilization of Hindus and India


सावरकर आणि सैनिकीकरण या मुद्द्यावर साधारणपणे सार्वजनिक पातळीवर चर्चा होते. पण सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणाबरोबरच हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचाही आग्रह धरला होता, याकडे फारसे लक्ष दिले गेलेले दिसत नाही.

सावरकर हे सैनिकीकरणाच्या आधीपासून देशाच्या आणि पर्यायाने हिंदूंच्या औद्योगिकीकरणाविषयी आग्रही होते. याचे प्रतिबिंब त्यांच्या किर्लोस्कर मासिकामधील लेखांमध्ये तर पडतेच पण त्याहीपेक्षा ते त्यांच्या हिंदू महासभेच्या अध्यक्षपदाच्या भाषणांमध्ये आणि मुलाखतींमध्ये अधिक पडताना दिसते.

सावरकरांच्या हिंदुत्वाला प्रत्युत्तर म्हणून महात्मा गांधींनी हिंद स्वराज्य नावाची संकल्पना मांडली असा दावा काही विचारवंत अलिकडे करताना दिसतात. त्यात ते गांधीप्रणित स्वदेशी आणि स्थानिक उद्योगाची भलामण करताना दिसतात. पण सावरकरांच्या हिंदुत्वाच्या परिप्रेक्ष्यात स्वदेशी बरोबरच आधुनिक स्वदेशीचा पुरस्कार आहे, हे ते विसरतात किंवा त्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करतात. आधुनिक आणि अद्ययावत (Modern and Up to Date) या दोन संकल्पनांवरून गांधी आणि सावरकरांच्या हिंदुत्व आणि हिंद स्वराज्य मध्ये भेद दिसतात.

नवे संशोधन, नवे तंत्रज्ञान स्वीकार की अस्वीकार यावरून दोन्ही नेत्यांमध्ये व्दंव्द दिसते. सामान्य जनतेच्या हाताला काम मिळाले पाहिजे म्हणून केवळ पारंपरिक ज्ञानावर आधारित उद्योगाला चिकटून राहणे सावरकरांना मान्य नाही. सामान्य माणूसही अद्ययावत होऊ शकतो. त्याची शिक्षणातून प्रगती होते. समाज अधिक प्रवाही आहे. त्याचा वेग वाढू शकतो, हे सावरकर युरोपच्या उदाहरणातून पटवून देण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ते प्रथम हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचा आग्रह धरतात.

तंत्रज्ञानाचा विकास ही निरंतर प्रक्रिया आहे. तंत्रज्ञानाची प्रगती थांबणारी नाही. तिचा तुम्ही स्वीकार करा अथवा नाकारा तंत्रज्ञान पुढेच जात राहणार हे सावरकरांचे प्रतिपादन आहे. म्हणूनच भारताच्या विकासासाठी ते आधुनिक आणि अद्ययावत (Modern and Up to Date) या संकल्पनांचा आग्रह धरताना दिसतात, हा मुद्दा येथे लक्षात घेतला पाहिजे. हिंदू महासभेच्या मदुराई अधिवेशनाच्या रिपोर्टिंगमध्ये त्यावेळच्या अमृतबजार पत्रिकेने हिंदूंच्या औद्योगिकीकरणाचा मुद्दा ठळकपणे उचलला आहे.

हिंदूंचे सैनिकीकरण

भारताचे पर्यायाने हिंदूंचे सैनिकीकरण हा सावरकरांच्या विचारांचा पुढचा टप्पा आहे. “ब्रिटिशांची महायुध्दातली अडचण ही भारतीयांसाठी संधी”, हे या मागचे सावरकरांचे मूलभत तत्त्व आहे. ब्रिटिशांनी भारतीयांना Disarmed केले. म्हणजे भारतीयांच्या हातातली शस्त्रविद्या काढून घेतली. ती पुन्हा मिळविण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून सावरकरांनी हिंदूंच्या सैनिकीकरणावर भर दिलेला दिसतो. त्यावेळी त्यांची काँग्रेसी नेत्यांनी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या नेत्यांनीही रिक्रूटवीर म्हणून संभावना केली असेल, पण १९६२ च्या चीनविरोधातील पराभवानंतर काँग्रेसी नेत्यांचे डोळेही खाडकन उघडले आणि त्यांनी सावरकरांच्या सैनिकीकरणाचे महत्त्व अप्रत्यक्ष मान्य केलेले दिसते.

सावरकरांचा हिंदूंच्या सैनिकीकरणाचा आग्रह हा त्यांच्या भोळ्या राष्ट्रनिष्ठेतून आल्याचा जावईशोध य. दि. फडके यांच्यासारखे विचारवंत लावताना दिसतात. पण सावरकर कोणत्या राजकीय – सामाजिक आणि सामरिक पार्श्वभूमीवर हिंदूंच्या सैनिकीकरणाचा आग्रह धरतात, याकडे फड़के आणि त्यांच्या पंथांतले विचारवंत दुर्लक्ष करतात.

यासाठी सावरकरांच्या सैनिकीकरणाची मूळ राजकीय – सामाजिक पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. १९४० च्या दशकात ज्यावेळी भारताचे स्वातंत्र्य दृष्टीपथात येत होते, त्यावेळी भारतीय सैन्यात मुसलमानांचे प्रमाण ५० टक्क्यांच्या पेक्षा अधिक होते. हे कसे ते पाहू या…

  • भारतीय सैन्यात मुसलमानांचे प्रमाण…
  • महंमद अली जीना यांच्या मते सैन्य दलात ६५ %, पोलीस दलात ७३ %
  • स्वा. सावरकर यांच्या मते सैन्य दलात ६० ते ६२ %
  • डॉ. आंबेडकरांच्या मते दुसऱ्या महायुद्धापूर्वी सैन्यातले प्रमाण ६० ते ७० %
  • महायुद्धानंतर ५० %
  • सरदार पटेल यांचे सचिव व्ही. पी. मेनन यांच्या मते सैन्यातले प्रमाण ६० %
  • ब्रिटिश जनरल लॉकहार्ट यांच्या मते ३५ ते ३७ %
  • या खेरीज पोलीस आणि प्रशासन व्यवस्थेत मुसलमानांचे प्रमाण ५० ते ७५ टक्क्यांपर्यंत होते.

भारतीय उपखंडात म्हणजे त्यावेळच्या अखंड भारतात मुसलमानांची सगळी मिळून लोकसंख्या २४ % होती. तेव्हाचे मुसलमानांचे हे सैन्य दलातले, पोलीस आणि प्रशासनातले टक्केवारीचे हे प्रमाण आहे.

या टक्केवारीवर तटस्थ नजर जरी टाकली तरी सावरकर हे हिंदूंच्या सैनिकीकरणाचा आग्रह का धरीत होते, हे लक्षात येते. येथे सरळसरळ Demographic administrative – military imbalance होता आणि तो सावरकरांना दूर करायचा होता. या आग्रहाचे ड़ॉ. आंबेडकरांनी सावरकरांचे नाव न घेता वेगळ्या प्रकारे समर्थनच केलेले आहे.

हिंदूंच्या सैनिकीकरणाचा आग्रह धरणारी मोहीम सावरकरांनी सक्रीयपणे चालवून त्यासाठी त्यांनी कलकत्यापासून कराचीपर्यंत आणि मदुराईपासून पेशावरपर्यंत दौरे केले होते. त्याच्या नोंदी सावरकर चरित्रात तर आहेतच, पण त्या दिल्लीच्या नेहरू मेमोरिअलच्या अर्काइव्जमध्येही उपलब्ध झाल्या आहेत. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील सैनिकांची काही पत्रे नेताजी सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय संग्रहालयाचे क्युरेटर प्रा. कपिल कुमार यांना आढळून आली आहेत. त्यामध्ये सावरकरांच्या प्रेरणेतून आपण सैन्यात गेल्याचा उल्लेख या सैनिकांनी केला आहे.

सावरकरांच्या प्रयत्नांमधून आणि ब्रिटिशांच्या महायुद्धकालीन गरजेतून सैन्य दलातले हिंदूंचे प्रमाण ६५ टक्क्यांवर गेल्याच्या नोंदीही अधिकृत कागदपत्रांमध्ये आहेत.

सावरकर सक्रीय राजकारणातून बाहेर पडल्यानंतरही त्यांच्या हिंदू सैनिकीकरणाच्या भूमिकेत बदल झालेला नाही. दिल्लीत १९५७ साली त्यावेळचे केंद्रीय मंत्री काकासाहेब गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली केलेल्या भाषणात सावरकरांनी हिंदू तरूणांनी डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीत आवर्जून नावे नोंदविण्याचा आग्रह धरला आहे. त्यासाठी काकासाहेबांनी तरूणांना मदत करावी, असेही सूचवतात. सावरकरांचे हे संपूर्ण भाषण यूट्यूबर उपलब्ध आहे. १९६२ मध्ये सावरकरांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई हिंदू महासभेने जो सैनिकीकरण सप्ताह आयोजित केला होता, त्याला फील्ड मार्शल करिअप्पा यांनी मार्गदर्शन केले होते.

या इतिहासाकडे समाजतल्या एका मोठ्या घटकाचे दुर्लक्ष झाले, तर काँग्रेसी इतिहासकारांनी तो झाकण्याचा आणि पुसण्याचाच प्रयत्न केला.

Veer Savarkar; Miltarization and industrilization of Hindus and India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात