Shivsena Unrest : ज्वालामुखी फुटण्याची प्रतीक्षा की सूडाच्या आगीत शिवसेनेलाच पूर्ण झोकायची तयारी…??


शिवसेनेतल्या खदखदीचा ज्वालामुखी पूर्ण फुटेपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वाट पाहात मातोश्रीत बसले आहेत का…?? असा खरेच गंभीर सवाल तयार झाला आहे.
Shivsena Unrest: Waiting for the volcano to erupt or Shivsena in the fire of revenge

शिवसेनेचे एकापाठोपाठ एक आमदार आणि खासदार मह विकास आघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात उघडपणे खदखद व्यक्त करत आहेत आणि तरीही मुख्यमंत्री मात्र आपला कारभार उत्तम चालला असे भासवत शांत बसले आहेत. हे नेमके कशाचे लक्षण आहे…??

स्वतः मुख्यमंत्री कमी बोलतात पण त्यांचे प्रवक्ते खासदार संजय राऊत दररोज भाजपवर तोफा डागतात. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट या केंद्रीय संस्थांना दोष देतात. पण शिवसेनेचे आमदार आणि खासदार यापैकी एकाही गोष्टीकडे लक्ष न देता थेट राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना टार्गेट करतात हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येत नाही का…?? की मुख्यमंत्री एकीकडे संजय राऊत आणि दुसरीकडे शिवसेनेच्या खासदार आणि आमदार यांच्या तोंडाने बोलत आहेत…??

पण यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमके साध्य काय करताहेत…?? शिवसेनेची प्रतिमाहानी यातून थांबणार आहे का…?? शिवसेनेला निधी वाटपात त्यांच्या आमदारांच्या संख्येनुसार न्याय मिळणार आहे का…?? हे खरे आणि गंभीर प्रश्न आहेत…!!

– तानाजी सावंत यांची खदखद बाहेर!!

शिवसेनेच्या अस्वस्थतेच्या खदखदीचे ताजे उदाहरण आमदार तानाजी सावंत यांच्या मुखातून बाहेर आले आहेत. त्यांनी तर उघडपणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर हल्लाबोल करत आम्ही शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या आदेशाची फक्त वाट बघत आहोत. शिवसेना पक्षप्रमुखांमुळे तुम्हाला सत्तेचे तोंड दिसले, नाही तर तुम्हाला महाराष्ट्रात कोण विचारत होते? आमच्या मांडीला मांडी लावून सत्तेवर बसलात आणि आमचाच निधी ओरबाडत आहात, असा थेट आरोप केला आहे. त्याच वेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेना आमदारांकडून बघून हसत असतात याचा संतापही व्यक्त केला आहे. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आदेश सोडला तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या नेत्यांकडे बघून घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे. तानाजी सावंत यांच्या इशाऱ्याकडे पक्षप्रमुख गांभीर्याने बघणार आहेत का…??

– तानाजी सावंत एकटे नाहीत

शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते, खासदार संजय जाधव, खासदार श्रीरंग बारणे, आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे खुद्द शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत खासदार गजानन कीर्तिकर यांनी उघडपणे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना टार्गेट केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व शिवसेना पोखरते आहे हे उघडपणे हे सर्व खासदार बोलत आहेत. त्याच्यापाठोपाठ शिवसेनेतल्या आमदारांनी देखील मोठ्या प्रमाणावर असंतोष व्यक्त केला आहे. 25 ते 30 शिवसेना आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात पूर्ण नाराज आहेत. शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी या नाराजीला तोंड फोडले आहे.

– एवढी नाराजी कोणत्याही सत्ताधाऱ्यांत नव्हती

ज्या पक्षाचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात सत्तेवर विराजमान आहेत त्या पक्षातले एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार खासदार नाराज आहेत, असे इतिहासात कधीही घडले नव्हते. अगदी काँग्रेसच्या गटातटाच्या राजकारणात ही केंद्रीय नेतृत्वाने फूस लावल्याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ला ज्वालामुखी उफाळून बाहेर येत नसे…!! पण शिवसेनेची गोष्ट ती नाही. राष्ट्रवादी काँग्रेस कडून निधी वाटपात प्रचंड अन्याय, संघटनात्मक पातळीवर कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस कडून होणारी कोंडी यामुळे शिवसेनेचे खासदार, आमदार आणि शिवसैनिक प्रचंड अस्वस्थ आणि संतप्त आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना एवढेच काय तर खुद्द ठाकरे घराण्याचा मुख्यमंत्री असताना सत्तेचे लाभ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस उठवते आहे, हा शिवसैनिकांचा संताप आहे…!!

– सूडाची आग कोणाला संपवणार??

शिवसेनेचे खासदार आमदार आणि शिवसैनिक खरंच थेट आदेशाची वाट बघताहेत आणि तरी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मातोश्रीवर एक तर शांत बसून आहेत. किंवा विधानसभेत तोंड उघडून ते फक्त भाजपवर हल्लाबोल करताना दिसत आहेत. हे नेमके काय घडत आहे…?? असे कोणते “गारुड” मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोणी केले आहे…?? की उद्धव ठाकरे हे भाजप विरोधातल्या सूडाने एवढे पेटले आहेत की ते स्वतःच या सूडाच्या अग्नीत संपूर्ण शिवसेनेलाच झोकून देत करत आहेत…?? याचा विचार दररोज “असाइनमेंट” दिल्यासारखे तोफा डागणारे संजय राऊत करणार नाहीत…!! पण मुख्यमंत्री म्हणून सोडा, पण पक्ष प्रमुख म्हणून तरी उद्धव ठाकरे करणार आहेत की नाही…?? हा खरा आणि गंभीर प्रश्न आहे…!!

Shivsena Unrest: Waiting for the volcano to erupt or Shivsena in the fire of revenge

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात