Russia – Savarkar – Nehru : सावरकरांनंतर नेहरूंवर ट्विट करण्याची संजय राऊतांची राजकीय कसरत!!

नाशिक : आजच्या सावरकर पुण्यतिथीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विसर पडलाच आहे, पण शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी सावरकर यांना श्रद्धांजली वाहताना केंद्र सरकारवर निशाणा साधत सावरकरांना अद्याप भारतरत्न किताब दिला नसल्याची ही आठवण करून दिली आहे. Russia – Savarkar – Nehru: Sanjay Raut’s political exercise to tweet Nehru after Savarkar !!

पण त्या पलिकडे जाऊन संजय राऊत यांनी एक राजकीय खेळी देखील केली आहे. सावरकर यांना श्रद्धांजली वाहणारे ट्विट केल्यानंतर संजय राऊत यांनी सध्याच्या रशिया – युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची भलामण करणारे ट्विट देखील करून राजकीय कसरत करण्याचा प्रयत्न केला आहे.

त्याचे झाले असे… आज सावरकर पुण्यतिथी निमित्त संजय राऊत यांनी सावरकरांना अभिवादन करणारे ट्विट केले. त्यामध्ये त्यांनी भारतरत्न अभिवादन!! असा शब्द प्रयोग केला. त्याच वेळी त्यांनी सावरकरांच्या धाडसी जीवनाचा आढावा घेणाऱ्या काही ओळी लिहिल्या.

पण त्यानंतर तासाभरातच त्यांनी पत्रकार सागरिका घोष यांचे एक ट्विट रिट्विट केले. रशिया आणि युक्रेन यांच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या बैठकीत आज भारत तटस्थ राहिला या मुद्द्यावरून सागरिका घोष यांनी, नेहरूंचा द्वेष करणाऱ्या केंद्र सरकारला शेवटी नेहरूंच्या अलिप्ततावादाचाच पुरस्कार करावा लागला, असे टोचले आहे. इतकेच नाही तर नेहरू द्वेष करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की नेहरू अद्याप “जिवंत” आहेत आणि त्यांची “प्रकृती उत्तम” आहे. म्हणजेच त्यांचा अलिप्ततावाद अजून जिवंत आहे, अशा खोचक शब्दात सागरिका घोष यांनी केंद्र सरकारला सुनावले आहे. सागरिका घोष यांचे हे ट्विट संजय राऊत यांनी रिट्विट केले आहे.

म्हणजेच एकीकडे सावरकरांना अद्याप भारतरत्न किताब दिला नाही म्हणून केंद्र सरकारला टोचणाऱ्या संजय राऊत यांनी दुसरीकडे नेहरूंची भलामण करणारे ट्विट रिट्विट करून काँग्रेसलाही खूश केले आहे. महाराष्ट्रात काँग्रेसच्या टेकूवर महाविकास आघाडी सरकार टिकले आहे. त्यामुळे एक प्रकारे सावरकर आणि नेहरू अशी दुहेरी राजकीय कसरत संजय राऊत यांना करावी लागल्याचे यातून दिसून येत आहे.

Russia – Savarkar – Nehru : Sanjay Raut’s political exercise to tweet Nehru after Savarkar !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात