“पानिपत” : भले भारताला चिथावणी देण्यासाठी किंवा कुरापत काढण्यासाठी किंवा हिणवण्यासाठी तालिबानी सैन्याने आपल्या तुकडीला “ते” नाव दिले असेल, पण भारतीयांसाठी आणि विशेषत: मराठ्यांसाठी “पानिपत” हा कलंक नाही, तर मराठ्यांच्या जबरदस्त संघर्षाशील विजिगिषू इतिहासाचे प्रतीक आहे, असे पक्के प्रतिपादन दोन प्रख्यात इतिहासकारांनी केले आहे. विश्वास पाटील आणि डॉ. उदय कुलकर्णी ही त्यांची नावे आहेत…!! Panipat: The Taliban may have named the unit “Panipat”; Now the next task of the Indian Army … !!
विश्वास पाटलांनी “पानिपत” ही कादंबरी लिहून मराठ्यांचा पराक्रमी इतिहासावर प्रकाश टाकला आहे. संबंधित पुस्तक कादंबरी जरी असली तरी ती कपोलकल्पित नाही किंवा फक्त मनोरंजक नाही तर त्यासाठी विश्वास पाटलांनी अथक संशोधन केले आहे. मराठे कुठून कसे पोहोचले?, 14 ऑगस्ट 1761 रोजी नेमके काय घडले?, याचे तपशीलवार वर्णन विश्वास पाटील आपल्या कादंबरीच्या अखेरीस परिशिष्टामध्ये देतात. त्यांच्या याच कादंबरीवर आधारित आशुतोष गोवारीकर यांनी “पानिपत” हा भव्य चित्रपट बनवून तो हिट केला आहे.
इतकेच नाही तर त्या पलिकडे जाऊन पुण्यातील संशोधक डॉ. उदय कुळकर्णी यांनी अत्यंत कष्टपूर्वक संशोधन करून “सॉल्ट्सिट ऑफ पानिपत” हा विचक्षण ग्रंथ साकारला आहे. ही कादंबरी नसून तो संशोधन ग्रंथ आहे. पानिपत युद्धापूर्वी प्रत्यक्ष पानपतावर आणि पानिपत नंतर नेमके काय घडले?, या इतिहासावर डॉ. कुलकर्णी यांनी जो संशोधनात्मक प्रकाश टाकला आहे, त्यातून “पानिपत” ही मराठ्यांसाठी कलंक तर नाहीच उलट “पानिपत” मराठ्यांसाठी खऱ्या अर्थाने चिथावणी ठरली. कारण त्यानंतर मराठ्यांनी आपल्या साम्राज्याची दिल्लीपर्यंत धडक मारली. दिल्लीवर मराठ्यांचे सरदार महादजी शिंदे यांनी भगवे निशाण फडकावले, हा इतिहास सविस्तरपणे डॉ. कुलकर्णी यांनी आपल्या ग्रंथात मांडला आहे.
त्याहीपेक्षा पलिकडे जाऊन अवघ्या 28 वर्षांच्या सदाशिवराव भाऊ पेशवे यांचे वर्णन त्यांनी भारताचे खर्या अर्थाने “धर्म आणि पंथ निरपेक्ष सैन्य उभे करणारे नेतृत्व” असे केले आहे. सदाशिवराव भाऊ पेशवे हे त्यांच्या मते भारताचे “पहिले जनरल” होत.
14 जानेवारी 1761 या दिवशी दुपारी तीन वाजेपर्यंत लढाईच्या विजयाचा मोहरा मराठ्यांकडे झुकत होता, पण अचानक वाऱ्याची दिशा बदलली. सूर्यकिरणांनी घात केला आणि मराठ्यांचा विजय हातातोंडाशी आलेला विजय हिरावला गेला, असे ऐतिहासिक पुराव्यांवर आधारित निष्कर्ष विश्वास पाटील आणि डॉ. उदय कुलकर्णी यांनी काढले आहेत.
महत्वाचे म्हणजे त्या वेळेच्या मराठ्यांच्या परराष्ट्र धोरणावर आणि संरक्षण धोरणावर देखील डॉक्टर कुलकर्णी यांनी भाष्य केले आहे. पानिपत मध्ये 14 जानेवारी 1761 रोजी मराठे जरी हरले असले, तरी मराठ्यांची विजयाकांक्षा अजिबात कमी झाली नाही, उलट ती वाढली. त्यानंतर अवघ्या दोन वर्षांमध्ये महादजी शिंदे यांनी मराठ्यांनी आधी गमावलेला प्रदेश पुन्हा काबीज केला. ज्याच्या गद्दारीमुळे अहमदशाह अब्दाली भारतात आला त्यांना नजीबखानाचे थडगे दुआबात जाऊन उध्वस्त केले. मराठ्यांची सत्ता अखिल हिंदुस्थानावर पुन्हा बसवली. श्रीमंत माधवराव पेशवे यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या सत्तेचा वचक आणि दरारा पुढील 11 वर्षे अखिल हिंदुस्थानावर राहिला हे ऐतिहासिक पुराव्यांसह डॉ. कुलकर्णी यांनी सिद्ध केले आहे.
अहमदशहा अब्दालीला मराठ्यांनी असा तडाखा दिला की पुन्हा त्याचे पाय हिंदुस्थानकडे वळले नाहीत, इतकेच काय तर खैबरखिंडीतून पुन्हा आक्रमण करण्याची हिंमत मुसलमानांची झाली नाही असे महत्त्वाचे निरीक्षण डॉ. कुलकर्णी नोंदवतात.
आज अफगाणिस्तानमधील तालिबान राजवटीने भले आपल्या एका तुकडीचे नाव “पानिपत” ठेवून भारताला चिथावणी दिली असेल किंवा कुरापत काढली असेल किंवा हिणवण्याचा प्रयत्न केला असेल, तरी प्रत्यक्षात “पानिपत” हा भारतीयांसाठी कलंक नाही, तर स्फूर्तिदायक इतिहास आहे… आणि एवढेच नव्हे तर पराभवातून उठून फिनिक्स प्रमाणे झेप घेण्याची प्रेरणाही आहे. त्याला इतिहास साक्षी आहे…!!
ज्या अर्थी सन 2022 मध्ये तालिबान्यांनी आपल्या तुकडीचे नाव “पानिपत” ठेवले आहे, त्याअर्थी भारताच्या पश्चिम आघाडीवर पुढच्या दोन वर्षात काहीतरी घडणार आहे, याची त्यांना जाणीव आहे… किंवा त्यांना तिथे काहीतरी घडवायचे आहे आहे… आणि… तेथेच तालिबान्यांनी भारतीय सैन्याच्या विजयाची नांदी जणू स्वतःच्या हाताने लिहिली आहे… कारण त्यांनी आपल्या सैन्यात तुकडीचे नाव “पानिपत” ठेवले आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App