तुमचे पेनच रोखेल लिखाणातील चूक

खूप वेळ सतत लिहले तर आपले अक्षऱ काही काळाने हळू हळू बिघडू लागते. मात्र खूप लिहताना आपल्या लक्षात ही बाब येतच नाही. तसेच लिहताना अनेकदा व्याकरणाच्या चुकाही होत असतात. पण आपल्या लक्षात पुन्हा वाचल्याशिवाय या चुका येत नाहीत. आपले अक्षर सुंदर असावे असे प्रत्येकालाच वाटत असते आणि योग्य सराव केला तर अक्षर सुधारता येत असते. पण व्याकरण किंवा स्पेलिंगचे तसे नाही. Only your pen will stop the typo

त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी व्याकरणाचा चांगला अभ्यास असावा लागतो आणि स्पेलिंगसाठी चांगले पाठांतरदेखील असावे लागते. पण यातील सर्वच गोष्टी जुळून येत नाहीत. व्याकरणातील व स्पेलिंगमधील या चुका सुधारायच्या कशा असा प्रश्न कदाचित यापुढे पडणार नाही. कारण आता अशा चुका होणारच नाही आणि समजा झाल्या तर लिहताक्षणी तुम्हाला त्याची जाणीव करुन देणारे एक स्मार्टपेन विकसित करण्यात आले आहे. जर्मनीतल्या एका कंपनीने हे पेन विकसित केले आहे. या पेनने लिहिताना स्पेलिंग चुकत असतील किंवा त्यांच्या काही व्याकरणविषयक चुका होत असतील तर तुम्हाला लगेच सूचना मिळणार आहे. आहे की नाही नवल. त्यामुळे चुका होण्याची शक्यताच कमी होणार आहे. लहान मुलांना अभ्यासात येणाऱ्या अडचणी लक्षात घेवून हे पेन बनविण्यात आलेले आहे.

जर्मनच्या लर्नशिफ्ट या कंपनीने हे स्मार्टपेन विकसित केले आहे. खरे तर हे पेन लहान मुलांना डोळ्यांसमोर ठेवून बनवण्यात आले आहे खरे. मात्र त्याचा उपयोग आबालवृद्धांना होणार आहे. सध्या ते प्राथमिक अवस्थेत असून लवकरच त्याला अंतिम रूप देण्यात येणार आहे. या स्मार्टपेनला दोन मोड आहेत. यातील आर्थोग्राफी मोड स्पेलिंग किंवा व्याकरणविषयक चुका होण्यापासून रोखणार आहे तर कॅलिग्राफी मोड सुवाच्य व सुंदर अक्षर काढण्यास मदत करणार आहे. लिहिणारी व्यक्ती जेव्हा कधी चूक करेल तेव्हा यातील विशेष सेन्सर प्रणाली त्याच्या हाताला व्हायब्रेशनचा हलकासा झटका देईल. त्यामुळे यापुढे सुंदर व अचूक लेखनाचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यामिळे लिहताना आता यापुढे खराब अक्षऱ येणारच नाही याची खात्री देथा येणार आहे. शिवाय त्यामुळे मनात होणारा न्यूनगंडदेखील कमी होणार आहे.

Only your pen will stop the typo