महाराष्ट्र बंदसाठी लखीमपूर-खीरीचे “नाव”; प्रत्यक्षात महाविकास आघाडीत पहिला नंबर पटकावण्याचा “डाव”!!


नाशिक : महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्र येऊन उद्या महाराष्ट्र बंद पुकारण्याचा ऐन नवरात्रातला जो मुहूर्त निवडला आहे ना, त्या बंदसाठी लखीमपूर खीरीचे नाव, पण प्रत्यक्षात येणाऱ्या 18 महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीतच पहिला नंबर पटकावण्याचा तीनही पक्षांचा “डाव” असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. “Name” of Lakhimpur-Khiri for Maharashtra Bandh; In fact, the “innings” to win the first number in the Mahavikas front !!

अन्यथा ज्या हिंसाचाराची चौकशी सुरू होऊन केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलाला अटक देखील झाली आहे त्याच्या अटकेला एक दिवस पूर्ण उलटल्यानंतर महाराष्ट्रात बंद करण्याचे प्रयोजनच उरत नाही. परंतु या सर्व प्रकारात मूळात महाविकास आघाडीच्या बंदचे राजकीय प्रयोजनच मुलभूतरित्या वेगळे असल्याने “कसेही कर पण रेटून कर”, अशा आशयाने उद्याचा महाराष्ट्र बंद यशस्वी करण्याचा चंग महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी बांधला आहे. या घटक पक्षांपैकी शिवसेनेचा बंदचे रेकॉर्ड कायम शंभर टक्के राहिले आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे रेकॉर्ड तसे नाही. किंबहुना या दोन्ही पक्षांची आंदोलन करण्याची क्षमता देखील शिवसेनेएवढी नाही. हे आत्तापर्यंत वारंवार सिद्ध झालेले आहे.

परंतु, महाराष्ट्र बंद च्या कार्यक्रम यात राष्ट्रवादी काँग्रेसने ज्या पद्धतीने पुढाकार घेतल्याचे दिसते त्यामध्ये आपला ठिसूळ झालेला पाया मजबूत करण्याचा मनसूबा यात दिसतो.
महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने पाया मजबूत करणे आणि जमल्यास थोडाफार विस्तार करणे हा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा मनसुबा आहे. उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी शिवसैनिक रस्त्यावर उतरले तर बंद यशस्वी होणे अवघड नाही. बंद यशस्वी झाला की त्याच्या श्रेयाचा वाटा शिवसैनिकांच्या ऐवजी आपलाच कसा मोठा होता हे सांगण्याची चढाओढ लागेल. यात राष्ट्रवादीचे नेते आघाडीवर असतील हे सांगायला कोणा राजकीय ज्योतिषाची गरज नाही. आणि हा बंद यशस्वी झाला की याचा राजकीय लाभ आपापल्या परिक्षेत्रातील पक्ष संघटना मजबुतीकरणासाठी आणि विस्तारासाठी नेते करून घेतील यातही शंका नाही.



18 महापालिकांच्या विद्यमान पक्षीय बलाबलाकडे नुसती एक नजर टाकली तरी एक बाब लक्षात येईल ती म्हणजे पारंपारिक पद्धतीने शिवसेना आणि भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी या लढतीत शिवसेना आणि भाजप यांचे एकत्रित बळ कितीतरी मोठे आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष शिवसेना आणि भाजप यांच्या जवळपासही पोहोचताना दिसत नाहीत. अशा स्थितीत आहे ते टिकवून थोडेफार वाढवता आले तर पहावे या हेतूने उद्याच्या बंद पासून खऱ्या अर्थाने राजकीय हालचाली करण्यास प्रारंभ होईल. आणि यामध्ये काँग्रेस पेक्षा राष्ट्रवादीने आघाडी घेतल्याचे दिसते आहे. मुंबईच्या आसपासच्या महापालिकांमध्ये म्हणजे नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा भाईंदर, भिवंडी आदी महापालिकांमध्ये शिवसेना आणि भाजप यांच्यातच काय ती राजकीय स्पर्धा आहे. काँग्रेस तिसऱ्या नंबरवर आहे आणि राष्ट्रवादी चौथ्या नंबरवर. इथे पक्षाच्या विस्ताराची त्यांना फारशी संधी नाही.

पण पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये मात्र राष्ट्रवादीला आपले मूळ बळ जे काँग्रेस मधून खेचून घेतले आहे, ते पुन्हा निर्माण करायचे आहे. मध्यंतरीच्या काळात राष्ट्रवादीचे हे बळ भाजपने खेचून घेतले आणि पुणे – पिंपरी चिंचवड या महापालिकांवर गेली पाच वर्षे सत्ता चालविली. इथून पुढच्या सहा महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये हाच प्रयत्न राहील की आपली गमावलेली शक्ती काही प्रमाणात का होईना पण परत मिळवायची. थोडीफार नवी मुंबईत कमवायची. बाकीच्या ठिकाणी जे मिळेल ते घ्यायचे. सोलापूर सारख्या महापालिकेमध्ये काँग्रेसला पोखरून जेवढी शक्य होईल तेवढी शक्ती मिळवायची. या पद्धतीने आपला विस्तार करायचा. यातून आपला निवडणूक परफॉर्मन्स शिवसेनेच्या पेक्षा अधिक दाखवता आला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांचा ते मोठे यश असणार आहे.

आणि यातून राष्ट्रवादीला पुढच्या विधानसभा निवडणुकीपर्यंत महाविकास आघाडीतला सर्वात मोठा घटक पक्ष या नात्याने उभे राहता येईल. हा राष्ट्रवादीच्या नेत्यांचा मूळ मनसूबा दिसतो आहे. त्यामुळे महाराष्ट्र बंदसाठी लखीमपूर खीरीचे “नाव”; पण प्रत्यक्षात महापालिकांच्या निवडणुकाचा “डाव” असल्याचे स्पष्ट दिसते.

“Name” of Lakhimpur-Khiri for Maharashtra Bandh; In fact, the “innings” to win the first number in the Mahavikas front !!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात