“हम सिर्फ लता मंगेशकर को जानते है!!”, हे उद्गार होते, विश्वविक्रमी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचे. तेही भारतीय क्रिकेट टीमच्या पाकिस्तान दौऱ्यात…!! lata mangeshakar passed away
लतादीदींना गायना इतकेच क्रिकेटचे वेड होते. भारतात जेव्हा कसोटी सामने होत असत. त्यावेळी त्या आवर्जून हजेरी लावून आपल्या क्रिकेटपटूंचा खेळ पाहून कौतुक करत असत. 1980 च्या दशकात त्यावेळी गावस्कर यांच्या नेतृत्वाखाली भारताची टीम पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेली होती. त्यावेळी भारतीय टीमचे व्यवस्थापक राजसिंग डुंगरपूर यांनी लाहोरमध्ये पंचतारांकित हॉटेलात पाकिस्तानमधल्या एलिट क्लाससाठी एक पार्टी आयोजित केली होती. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही क्रिकेट टीम त्याला हजर होत्या. लाहोर मधील अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे या पार्टीला निमंत्रित होते. यापैकी एक होत्या, मल्लिका एरन्नूम नुरजहाँ पार्टीला आल्या.
अंगावर हिऱ्या-मोत्यांचे दागिने, अंगावर चमचमती साडी अशा लखलखाटात त्यांचे आगमन झाले. त्यावेळी लता मंगेशकर भारी? की नुरजहाँ भारी?, असा वाद रंगला होता. राजसिंग डुंगरपूर यांनी पुढे होऊन यांचे स्वागत केले आणि भारतीय टीमची त्यांच्याशी ओळख करून दिली. सुनील गावस्कर यांची ओळख करून देताना राजसिंग म्हणाले, “आपने तो पहचाना होगा. ये है हमारे टीम के कप्तान सुनील गावस्कर.” त्यावेळी नूरजहाँ चटकन उद्गारल्या, “जी नही. हम सिर्फ इमरान को जानते है”…!!
त्यावर डुंगरपूर यांनी सुनील गावस्कर यांना विचारले, तुम्ही ह्यांना ओळखत असालच? त्यावेळी सुनील गावस्कर चटकन उद्गारले, “जी नही हम सिर्फ लता मंगेशकर को जानते है.”…!! सुनील गावस्कर यांच्या या उद्गारांनंतर मल्लिका नूरजहाँ थोड्याशा शिरल्या. किंचित हसत पुढे निघून गेल्या. लता मंगेशकर यांच्या गायन कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली, त्यावेळी सुनील गावस्कर यांनी जाहीर सत्कार कार्यक्रमात ही आठवण सांगितली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App