लतादीदी – शांताबाई शेळके शब्द स्वरांचे सुरेल मैत्र!!

 

लतादीदींनी आपल्या स्वर्गीय सूरांनी अवघ्या जगाला वेड लावले असले तरी त्यांचे मैत्र लाभण्याचे भाग्य फार थोड्या जणांना मिळाले होते. त्यापैकीच एक मराठीतील कवयित्री शांता शेळके होत्या. शांताबाईंची सध्या जन्मशताब्दी सुरू आहे. lata mangeshakar passed away

मराठी चित्रपट “राम राम पाव्हणं”ला लता मंगेशकर यांनी आपल्या नावाने संगीत दिले होते या आधी “मराठा तितुका मेळावा” या चित्रपटाला त्यांनी आनंदघन या नावाने संगीत दिले होते. “राम राम पाव्हणं” या चित्रपटासाठी शांता शेळके यांच्याकडून दिग्दर्शक दिनकर पाटलांनी यांनी गीते लिहून घेतली. त्यानंतर शांताबाईंचे लता मंगेशकर यांचे मैत्रीचे सूर जुळत गेले. ते हळूहळू घट्ट होत गेले. त्यांचा घरोबा वाढला. हृदयनाथ मंगेशकर यांनी शांताबाईंकडून अनेक कोळीगीते लिहून घेतली. “मी डोलकर डोलकर दर्याचा राजा”, “माझ्या सारंग रे” ही गीते मंगेशकरांच्या आपल्या स्वरातून अजरामर झाली. मंगेशकरांचे कुलदैवत श्री मंगेशाचेही गीत शांताबाईंनी लिहिले. “पुढे उभा मंगेश मागे उभा मंगेश” हे शांताबाईंचे गीत देखील मंगेशकरांच्या स्वरातून अजरामर झाले.शांताबाई आणि लता मंगेशकर यांना पेंटिंग आणि स्केचींगचा नाद होता. शांताबाईंनी आपल्या पेन्सिलीतून लताबाईंचे एक सुंदर स्केच साकारले होते. त्याची आठवण शांताबाईंनी ललित मासिकाच्या 1978 च्या दिवाळी अंकात लिहिली होती. त्याचबरोबर शांताबाईंच्या पेन्सिलीतून साकारले स्केच त्या अंकात छापण्यात आले होते.

शांताबाई वरचेवर “प्रभू कुंज” मध्ये जात असत. त्यांच्या गप्पा होत असत. या गप्पांच्या ओघातच आपल्याला भरपूर गाणी सुचत असत. त्या मी लिहून काढत असे. त्यातली अनेक गाणी आज लोकांच्या ओठावर आहेत, अशी आठवण शांताबाईंनी एका मुलाखतीत सांगितली होती. लतादीदी सुगरण होत्या. त्या अनेक पदार्थ शांताबाईंना आग्रहाने करून खाऊ घालायच्या. लता मंगेशकर यांच्या अनेक सांगीतिक दौऱ्यांमध्ये त्या सहभागी व्हायच्या. शांताबाईंच्या अखेरपर्यंत हे शब्द – सूरांचे हे मैत्र टिकून राहिले. शांताबाई आधीच गेल्या. आज लताबाई पण आपल्यातून निघून गेल्या…!! पण शब्द सूरांचे हे मैत्र अजरामर आहे…!!

lata mangeshakar passed away

महत्त्वाच्या बातम्या