नाशिक : देशात सावरकर युगाचा उदय झाला आहे, असे वक्तव्य भारताचे माहिती आयुक्त आणि प्रत्येक पत्रकार उदय माहुरकर यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याचा प्रतिवाद इतिहासकार इरफान हबीब यांनी केला आहे. “सावरकर :द मॅन हू कुड हॅव प्रिव्हेंटेड पार्टिशन” हे पुस्तक उदय माहुरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिले आहे. त्याचे प्रकाशन मुंबईत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक आणि झाले. यावेळी उदय माहुरकर यांनी देशाच्या संरक्षण आणि परराष्ट्र धोरणावर भाष्य करताना भारतात सावरकर युग आले आहे, असे वक्तव्य केले होते. देशाचे परराष्ट्र आणि संरक्षण धोरण सावरकर वादावर चालते. केंद्र सरकारने सावरकरांचे विचार आत्मसात करून हे धोरण आखले आहे आणि त्यामुळेच देशात सावरकर युगाचा उदय झाला आहे, असे उदय माहुरकर म्हणाले. Gandhi era of Savarkar era
त्यावर इरफान हबीब यांनी आक्षेप नोंदवला आहे. देशात सावरकर युग आणि गांधी युग एकत्र नांदू शकत नाहीत. हे दोन नेते भारताच्या राजकारणातले दोन ध्रुव आहेत, वैचारिक आणि राजनैतिक पातळीवरही. सावरकरांवर गांधीजींच्या हत्येचा आरोप होता. अशा स्थितीत भारतातले सध्याचे सत्ताधारी एकीकडे स्वच्छ भारत अभियानात गांधीजींचे महिमा मंडन करतात आणि दुसरीकडे सावरकरांचेही महिमा मंडन करतात. ही त्यांची दुटप्पी राजनीती आहे. असे चालू शकत नाही. देशात एक तर सावरकर युग चालावे किंवा गांधी युग अशा शब्दात इरफान हबीब यांनी उदय माहुरकर यांचे वाभाडे काढले आहेत.
आत्तापर्यंत फक्त सत्ताधारी नेतेच सावरकरांचे महिमा मंङन करत होते परंतु आता अधिकारी देखील त्यांच्याच महिमा मंडन करत आहेत. अधिकाऱ्यांनी देखील दुटप्पीपणा चालवला आहे, अशी टीका इरफान हबीब यांनी केली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App