मेंदूचा शोध व बोध : मेंदूत डोकावून पाहणारे तंत्र


मेंदूवर जगभर सतत संशोधन सुरु असते. अनेकदा मेंदूची पुरेशी काळजी घेवूनही त्याला इजा होण्याचा धोका असतो. कधी कधी अपघातातही मेंदूला मार लागू शकतो. त्यावेळी मेंदूच्या अनेक भागांना इजा होण्याची शक्यता असते. त्यावेळी काय करायचे असा प्रश्न तज्ञांना पडत असे. त्यातूनच मग वेगवेगळ्या प्रकारे संशोधन होत गेले. Brain peeking techniques

आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या आधारे आता मेंदूच्या आता डोकावून पाहता येते. विद्युत्‌ मस्तिष्कालेख म्हणजेच इलेक्ट्रोएनसिफॅलोग्राफी किंवा इईजी पद्धतीने चेतापेशीमधील विद्युत्‌ भाराचा आलेख बाह्य इलेक्ट्रोडच्या साहाय्याने मिळवितात. सन १९२४ मध्ये हॅन्स बर्गर या वैज्ञानिकाने सर्वप्रथम विद्युत्‌ मस्तिष्कालेख हे तंत्र विकसित केले. मेंदूचे कार्य सुरळीत चालले आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी हे तंत्र वापरले जाते.

विद्युत्‌ मस्तिष्कालेख काढण्यासाठी २०-३० मिनिटे पुरेशी असतात. डोक्याच्या त्वचेवर विशिष्ट ठिकाणी चकतीच्या आकाराचे इलेक्ट्रोड लावून विद्युत्‌ विभव आलेख काढला जातो. झोप व जागेपणा, निद्रानाश, अपस्मार, मानसिक आजारामुळे येणारे झटके, बेशुद्धी, तीव्र अर्धशिशी, शरीराची हालचाल एकाएकी थांबणे, उन्माद, मृत मेंदू यांच्या निदानासाठी विद्युत्‌ मस्तिष्कालेख तंत्र वापरले जाते. आधुनिक निदान तंत्रामध्ये चुंबकीय अनुस्पंद प्रतिमा (एमआरआय), पॉझिट्रॉन प्रतिमा (पॉझिट्रॉन इमेजिंग), संगणकीय प्रतिमानिर्मिती इत्यादी तंत्राने मेंदूतील रक्तवाहिन्या, गाठी, रक्तपुरवठा, रक्तस्राव, अपघातामुळे झालेली इजा, पक्षाघात, कर्करोगाच्या गाठी यांचे निदान करून शस्त्रक्रिया किंवा योग्य उपचार करता येतात.

एमआरआयसारख्या आधुनिक प्रतिमाग्रहण तंत्रामुळे मेंदूचे एखादे कार्य चालू असताना मेंदूच्या वेगवेगळ्या भागात काय घडते आहे, हे तपासणे शक्य झाले आहे. मेंदूच्या निरनिराळ्या भागांतील, विशेषकरून प्रमस्तिष्क बाह्यांगातील विद्युत्‌ कलापांची नोंद आणि मापन विद्युत्‌ शरीरशास्त्राद्वारे होते. मेंदूच्या कोणत्या भागास इजा झाल्याने कोणत्या कार्यावर परिणाम झाला आहे, याचाही सखोल अभ्यास मेंदूचे शल्यविशारद करतात.

मज्जावैज्ञानिक इतर शाखांतील संशोधकांबरोबर मेंदूचे कार्य कसे घडते ते जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. मेंदूचे कार्य कसे चालते, त्याची वाढ कशी होते यावर खूप संशोधन झाले असूनही मेंदूचे कार्य अजूनही पूर्णपणे उमगलेले नाही.

Brain peeking techniques

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात