डॉ. आंबेडकर, मोदी व पवार..; मोदींचे सौजन्य आणि पवारांची ‘नसलेली पतप्रतिष्ठा’


पवार यांच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने कधीच राजकीय लायकीपेक्षा जास्त राजकीय यश टाकलेले नाही. त्या अर्थाने जनतेने पवारांना प्रादेशिकमधलाही उपप्रादेशिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वापुरते मर्यादित ठेवले. मग पवारांसारख्या उपप्रादेशिक नेत्याची ‘राजकीय पत्रास’ देशपातळीवर ठेवायचे मोदींना कारण काय भासत असावे?
मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रातले युपीए सरकार त्यांना त्रास द्यायचे. सहकार्य करायचे नाहीत. त्यावेळी पवार हे मोदींना मदत करायचे… मान्य… एकदम मान्य… त्या बद्दल मोदींनी पवारांविषयी कृतग्यता जरूर दाखवावी. अगदी आवश्य दाखवावी… पण किती? महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपपासून फोडून भाजपच्या कायमच्या नुकसानाची पायाभरणी करेपर्यंत मोदींनी सौजन्य दाखवायचे? यात ultimate नुकसान हिंदुत्ववादी forces चे ना! या सर्व प्रकारात दोन हिंदुत्ववादी force एकमेकांशी झुंजताहेत आणि पवार mandate नसताना mandate वर दरोडा घालून सत्तेवर बसलेत हे समजत नाही का?


विनय झोडगे

“कोणताही पुरुष गुलामी स्वीकारून कृतग्य राहू शकत नाही. कोणतीही स्री शील गहाण टाकून कृतग्य राहू शकत नाही.” हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वचन आठवायचे कारण मोदी – पवार संबंधांचा याच्याशी संदर्भ लावता येईल.

शरद पवारांचे बोट धरून मी राजकारणात आलो असे पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते. त्यावर देशपातळीवर बरीच चर्चा झाली. पण महाराष्ट्रात पवार समर्थकांनी पवारांच्या सल्ल्यावरून याचा “वापर”ही वेगवेगळा करून घेतला. पवारांची राजकीय उंची मोदींएवढी आहे किंबहुना ती मोदींपेक्षा अधिक आहे, असे चित्र निर्माण करण्यासाठी आणि तसे चित्र निर्माण करून मोदी सोडून भाजपच्या केंद्रीय पातळीवरील अन्य नेत्यांना आणि राज्य पातळीवरील नेत्यांना कमी लेखण्यासाठी या चित्राचा चांगलाच वापर करून घेतला. यात मोदींचे फारसे काही बिघडले नाही हे खरे. म्हणजे मोदींची प्रतिमाहानी झाली नाही पण पवारांची त्यांच्या राजकीय कर्तृत्वापेक्षा किंबहुना राजकीय लायकीपेक्षा प्रतिमा अधिक सुधारण्यास मोदींच्या वक्तव्याचा आणि वर्तणुकीचा बराच “वापर” करवून घेण्यात आला.

आपण महाराष्ट्रात कधीही बहुमत मिळवू शकलो नाही तरी महाराष्ट्राचे राजकारण फिरवू शकतो, हा पवारांचा बौद्धिक दर्प पोसायला नजीकच्या काळातील मोदींच्या सौजन्यपूर्ण वर्तणुकीचा पवारांनी आणि पवार समर्थकांनी चांगलाच वापर करून घेतला. प्रसंगी मोदी हे पवारांचा सल्ला घेतात, असे भासविण्याइतपत पवार आणि त्यांचे समर्थक पुढे गेले.

वास्तविक पवार हे देशपातळीवरील अनेक प्रादेशिक नेत्यांपैकी एक नेते आहेत. त्यांना कधीच आपल्या राज्यात म्हणजे महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता मिळवता आली नाही. खुद्द पवारांना याची जाणीव नाही असे नाही. किंबहुना ही जाणीव असल्यानेच पवार हे सरळ मार्गाने म्हणजे निवडणुकीच्या मार्गाने सत्ता आणायचा प्रयत्न करत नाहीत. ते कायम मागच्या दाराने तडजोडी करून, जुगाड करूनच सत्ता आणण्याचा प्रयत्न करतात. काँग्रेसचे नेतेही मर्यादेबाहेर (खरे म्हणजे लायकीपेक्षा) पवारांना महत्त्वही देत नाहीत.

almost all prominent Congress leaders always kept PAWAR at bay…!!

मग त्या काँग्रेस नेत्यांवर राजकीय आणि बौद्धिकदृष्ट्या मात करण्यात पवार कमी पडले की ते स्वाभिमानाचा विषय काढतात आणि केंद्रात किंवा दिल्लीत जरी कोणी विचारत नसले तरी स्वाभिमानाच्या नावाखाली महाराष्ट्रात स्वत:ची राजकीय प्रतिष्ठा जपायचा प्रयत्न करतात. ही प्रतिष्ठा वास्तविक पाहता पवारांना सरळमार्गी आणि विश्वासाचे राजकारण करूनही जपता आली असती पण ती त्यांची मूलभूत राजकीय प्रवृत्ती नाही.

Rear entry आणलेली सत्ता राबवायची ती vested interests साठीच. सामान्य जनांचे कल्याण झाले तर जाता जाता करायचे हे आणि हेच त्यांच्या राजकारणाचे मूलभूत धोरण राहिले आहे…!! मात्र त्याचवेळी प्रतिमा निर्मितीत कमी पडायचे नाही. निदान प्रतिमाहानी होऊ द्यायची नाही, हे पवार १९९० – ९५ दरम्यान दाऊद प्रकरणातून शिकले.

पण मोदींना हे दिसत, समजत असूनही ते पवारांना मान देतात. महाराष्ट्रात भाजपचा तोटा होतोय हे कळत असूनही मोदी असे का करत असावेत…?? पवारांच्या तथाकथित राजकीय प्रतिष्ठेवर कुठाराघात का करत नसावेत…??

वास्तविक पवारांची खरी राजकीय लायकी महाराष्ट्राच्या जनतेने ओळखलीय असे म्हणावे लागेल. कारण त्यांच्यासारख्या व्यक्तीच्या पदरात महाराष्ट्राच्या जनतेने कधीच राजकीय लायकीपेक्षा जास्त राजकीय यश टाकलेले नाही. त्या अर्थाने जनतेने पवारांना प्रादेशिकमधलाही उपप्रादेशिक म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या नेतृत्वापुरते मर्यादित ठेवले. पवारही आपले maximum vested interests याच उपप्रादेशिक पट्ट्यात जपताना दिसतात. मग पवारांसारख्या उपप्रादेशिक नेत्याची “राजकीय पत्रास” देशपातळीवर ठेवायचे मोदींना कारण काय भासत असावे…??

मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना केंद्रातले युपीए सरकार त्यांना त्रास द्यायचे. सहकार्य करायचे नाहीत. त्यावेळी पवार हे मोदींना मदत करायचे… मान्य… एकदम मान्य… त्या बद्दल मोदींनी पवारांविषयी कृतग्यता जरूर दाखवावी. अगदी आवश्य दाखवावी… पण किती…?? आपल्या कृतग्यतेचा पवार आणि त्यांचे समर्थक गैरवापर करण्यापर्यंत येऊन ठेपले तरी…?? महाराष्ट्रात शिवसेनेला भाजपपासून फोडून भाजपच्या कायमच्या नुकसानाची पायाभरणी करेपर्यंत…?? मोदींनी सौजन्य दाखवायचे…?? यात ultimate नुकसान कोणाचे होतेय? हिंदुत्ववादी forces चे ना…!

मान्य आहे… भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या मनात शिवसेनेबद्दल जुनी अढी आहे… हिंदुत्वाच्या तत्त्वात वाटेकरी नकोय… पण या सर्व प्रकारात दोन हिंदुत्ववादी force एकमेकांशी झुंजताहेत आणि पवार mandate नसताना mandate वर दरोडा घालून सत्तेवर बसलेत हे समजत नाही का? ठाकरे factor भाजपच्या वरिष्ठांना अमान्य आहे… पण म्हणून “नजीबी प्रवृत्तीच्या” पवारांची प्रतिष्ठा टिकवत बसायचे? मोदींच्या कृतग्यतेची ही मर्यादा आहे?

महाराष्ट्राने पवारांना त्यांच्या राजकीय लायकीनुसार तिसऱ्या, चौथ्या क्रमांकाच्या पक्षाचे नेता ठेवलेय… मोदींनी आपल्या कृतग्येची मर्यादा ओलांडून त्यापेक्षा अधिक प्रतिष्ठा पवारांना देऊ नये…!! मोदींचा अधिकार देशभरातील जनतेच्या mandate मधून आलेला आहे…पवारांची लायकीपेक्षा प्रतिष्ठा वाढविण्याचे mandate देशभरातील तर सोडाच, महाराष्ट्रातील जनतेने देखील मोदींना दिलेले नाही. पण मोदी तसे करत असल्याने महाराष्ट्रात भाजपचे बरेच बिघडले असे समजायला बराच वाव आहे.

पवार आणि विश्वासार्हता हे शब्द परस्पर विरोधी आहेत. यावर महाराष्ट्रातील जनतेने सलग दोनदा शिक्कामोर्तब केले आहे. तो शिक्का पुसण्याचा अधिकार मोदींना दिलेला नाही. या अर्थाने देखील डॉ. आंबेडकरांचे वचन महत्त्वाचे ठरते.

इकडे भाजपचे महाराष्ट्रातील नेतेही विचित्र विधाने करताना दिसतात. भाजपचा DNA म्हणे विरोधी पक्षाचा आहे…!! हे विधान वस्तुस्थितीला धरून नाही. हा महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या mandate चा अपमान तर आहेच. पण हे विधान political strategy म्हणूनही चूक आहे. काँग्रेस – राष्ट्रवादीच्या “मुरलेल्या” नेते वरील विधानावर हसतात…!! त्यांच्या सरंजामी सत्तेवर एक प्रकारे मोहोर उमटवणारे हे विधान आहे. भाजपचा DNA विरोधी पक्षाचा आहे, हा इतिहास झाला. तो वाजपेयींनी बदलला. मोदींनी तर तो पारच बदलून टाकला. मोदी कधीही विरोधी बाकांवर बसलेले नाहीत,

एवढे तरी भाजपच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी लक्षात घ्यायला हवे होते. फडणवीस किंवा चंद्रकांत पाटलांकडून असले राजकीय खुळचट विधान अपेक्षित नाही…!! काँग्रेसी आणि राष्ट्रवादी प्रवृत्ती कायमची fracture करण्याची संधी असताना खुळचट विधाने करून खुळचट राजकीय खेळ्या करून ती संधी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी गमावू नये…!! एवढीच अपेक्षा…!!

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती