विशेष प्रतिनिधी
जम्मू : मैदानातील परिपक्वता फक्त खेळ कसा होतो, कोण जिंकते, कोण हारते यावर अवलंबून नसते. आपण आपली हार कशी स्वीकारतो यावरदेखील अवलंबून असते. आणि विराट कोहलीने याचे उत्तम उदाहरण सेट केले आहे असे म्हणायला हरकत नाही. T 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा पाकिस्तानकडून 10 विकेट्सने पराभव झाला होता.
Medical college students in Jammu charged as they celebrates Pakistan victory in T20 world cup
जम्मू काश्मीरमधील जेएमसी आणि स्कीम्स मेडिकल कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांवर टी ट्वेंटी विश्वचषकात पाकिस्तानच्या विजयाचा आनंद साजरा केल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. जम्मू काश्मीर पोलीस महानिरीक्षक विजयी कुमार यांनी या प्रकरणाला दुजोरा देत चौकशी सुरू असल्याचे सांगितले आहे.
ICC Men’s T20 World Cup : पाकिस्तान विरुध्दच्या सामन्यात भारताचा पराभव
यापूर्वी मनोहर गोपाला गावातील लोकांच्या निषेधात पोलिसांनी अशाच एका प्रकरणात एफआयआर नोंदवून सहा तरुणांना अटक केली होती. तर अन्य चौघांचा शोध सुरू आहे अशी माहिती दिली होती. याबाबत अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले, रविवारी रात्री भारत पाकिस्तान क्रिकेट सामना संपल्यानंतर मनोहर गोपाला गावातील एका समुदायातील तरुणांनी आनंदोत्सव साजरा करण्यास सुरवात केली होती.
दरम्यान विजयकुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पाकिस्तानच्या विजयानंतर आनंद साजरा केल्याप्रकरणी काही वैद्यकीय महाविद्यालयिन विद्यार्थ्यांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसून येत आहे. ज्यामध्ये हे विद्यार्थी पाकिस्तानच्या विजयाचा आनंद व्यक्त करत आहेत. आणि पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देत आनंदात नाचताना दिसून येत आहेत. अशी माहिती विजयकुमार यांनी दिली आहे.
या विद्यार्थ्यांवर आयपीसी कलम 105 अ आणि 505 आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंधक कायद्याच्या कलम 13 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App