Bank Holidays November 2021 : नोव्हेंबरमध्ये 17 दिवस बँका बंद राहणार! ही आहे सुट्यांची यादी!


नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आधी ही बातमी वाचा. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या नोव्हेंबर २०२१ मध्ये येणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. bank holidays 2021 banks will remain closed for 17 days in november check here full list of holidays


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : नोव्हेंबर महिन्यात बँकेशी संबंधित तुमची काही महत्त्वाची कामे असतील तर आधी ही बातमी वाचा. धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज, छठ पूजा, गुरु नानक जयंती अशा अनेक सुट्ट्या नोव्हेंबर २०२१ मध्ये येणार आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण महिन्यात एकूण 17 दिवस बँका बंद राहतील. तथापि, देशात वेगवेगळ्या राज्यांच्या हिशेबाने या सुट्या कमी अधिक आहेत. म्हणजे या सर्वच सुट्या सर्व ठिकाणी लागू नसतील. या महिन्यात सलग अनेक दिवस बँका बंद राहणार आहेत, त्यामुळे तुम्हालाही काही कमी महत्त्वाच्या गोष्टी करावयाच्या असतील, तर ही माहिती असणे गरजेचे आहे.

17 दिवस बँका बंद

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नोव्हेंबर महिन्यासाठी अधिकृत बँक सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात 17 सुट्ट्या आहेत. यादरम्यान भारतातील अनेक शहरांमध्ये बँका सतत बंद राहतील. या 17 दिवसांच्या सुट्टीमध्ये साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे.

आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, रविवारी तसेच महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद असतात. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स कायद्यांतर्गत, RBI ने 1, 3, 4, 5, 6, 10, 11, 12, 19, 22 आणि 23 नोव्हेंबर रोजी सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय महिन्यातील चार रविवार आणि दुसरा आणि चौथा शनिवार सुट्या आहेत.नोव्हेंबर 2021 मधील बँकेच्या सुट्या

 • 1 नोव्हेंबर – कन्नड राज्योत्सव / कुट – बेंगळुरू आणि इंफाळमध्ये बँका बंद
 • 3 नोव्हेंबर – नरका चतुर्दशी – बेंगळुरूमध्ये बँका बंद
 • 4 नोव्हेंबर – दिवाळी अमावस्या (लक्ष्मी पूजा) / दीपावली / काली पूजा – बेंगळुरू वगळता सर्व राज्यांमध्ये बँका बंद
 • 5 नोव्हेंबर – दिवाळी (बली प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / गोवर्धन पूजा – अहमदाबाद, बेलापूर, बंगलोर, डेहराडून, गंगटोक, जयपूर, कानपूर, लखनौ, मुंबई आणि नागपूर येथे बँका बंद
 • 6 नोव्हेंबर – भाऊबीज / चित्रगुप्त जयंती / लक्ष्मीपूजा / दीपावली / निंगोल चकोबा – गंगटोक, इंफाळ, कानपूर, लखनौ आणि शिमला येथे बँका बंद
 • 7 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
 • 10 नोव्हेंबर – छठ पूजा / सूर्य षष्ठी दाला छठ – पाटणा आणि रांची मध्ये बँका बंद
 • 11 नोव्हेंबर – छठ पूजा – पाटण्यात बँक बंद
 • 12 नोव्हेंबर – वांगळा उत्सव – शिलाँगमध्ये बँका बंद
 • 13 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा दुसरा शनिवार)
 • 14 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
 • 19 नोव्हेंबर – गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमा – एझोल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, हैदराबाद, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, रायपूर, रांची, शिमला, श्रीनगर येथे बँका बंद आहेत.
 • 21 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)
 • 22 नोव्हेंबर – कनकदास जयंती – बेंगळुरूमध्ये बँका बंद
 • 23 नोव्हेंबर – सेंग कुत्स्नाम – शिलाँगमध्ये बँका बंद
 • 27 नोव्हेंबर – शनिवार (महिन्याचा चौथा शनिवार)
 • 28 नोव्हेंबर – रविवार (साप्ताहिक सुट्टी)

bank holidays 2021 banks will remain closed for 17 days in november check here full list of holidays

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*  देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती