विशेष प्रतिनिधी
मुबंई : आर्यन खान प्रकरणाला प्रभाकर साईल यांनी एबीपी माझा या वाहिनीवर दिलेल्या माहितीमुळे आता नवे वळण मिळाले आहे. त्या नंतर समीर वानखेडे यांच्याविरोधात तक्रार करणारे वकील कनिष्ठ जयंत यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, ‘आर्यन खानचे अपहरण केले गेले. त्याला बेकायदेशीररीत्या कोठडीमध्ये ठेवण्यात आले. खंडणीसाठी त्याच्या कुटुंबीयांना त्रास देण्यात आला. भारताच्या कोणत्याही नागरिकाचे स्वातंत्र्य बनावटगिरी करून धोक्यात आणता येत नाही. एफआयआर दाखल होण्याच्या आधी किरण गोसावी सेल्फी घेतो काय आणि तो व्हायरल करतो काय. समीर आणि एनसीबी ने याबाबत आपली प्रतिक्रिया द्यावी.’ अशी मागणी त्यांनी केली होती.
Kiran Gosavi, a fugitive in the Aryan case, will surrender in Lucknow
या सर्व प्रकरणातील प्रमुख साक्षीदार किरण गोसावी मागील बऱ्याच दिवसांपासून फरार होता आणि पोलिस त्याच्या मागावर होते.
नुकताच हाती आलेल्या बातमीनूसार, इंडिया टुडेसोबत बोलताना साक्षीदार केपी गोसावी यांनी म्हटले आहे, ‘मी 15 मिनिटांमध्ये सरेंडर व्हायला तयार आहे. कारण मला धमकीचे फोन येत आहेत आणि माझ्या जिवाला धोका आहे. त्यामुळे मी लखनौमध्ये सरेंडर होण्यास तयार आहे.’ किरण गोसावी पुढे म्हणाले, ‘साक्षीदार प्रभाकर साईलने केलेल्या लाचखोरीच्या आरोपांवर माझा साफ विरोध आहे. मी एकही पैसा घेतलेला नाही. हे मी स्वत:ला वाचवण्यासाठी आजवर लपून बसलो होतो आणि आज शरण येणार आहे.’
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातल्या तपासाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावीचा दावा
एबीपी माझा या वाहिनीवर ह्या ड्रग प्रकरणात केलेल्या विधानांमुळे प्रभाकर साईल यांनी महाराष्ट्र पोलिसांकडून सुरक्षेची मागणी केली होती. महाराष्ट्र पोलिसांनी त्याला सुरक्षा दिलेली आहे.
त्याचप्रमाणे या प्रकरणातील मनीष भानुशाली यांनी इंडिया टुडेसोबत बोलताना म्हटले, ‘मला माहित नाही कोणी कोणी पैसे घेतलेले आहेत. पण मागील 20 दिवसांपासून मी ही लपून बसलो होतो. कारण मला माझी सुरक्षिततेची हमी हवी होती. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केला होता की, भानुशाली हे एक भाजप कार्यकर्ते आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App