आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातल्या तपासाचे लक्ष दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत; नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावीचा दावा


वृत्तसंस्था

मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास दुसरीकडे वळविण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा साक्षीदार किरण गोसावी याने केला आहे. किरण गोसावी बेपत्ता असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे. पुण्याच्या फरासखाना पोलीसांत त्याच्या विरोधात तक्रार दाखल झालीच आहे. Aryan Khan drugs case; Narcotics Control Bureau witness Kiran Gosavi claims

मात्र, किरण गोसावी याने एएनआय वृत्तसंस्थेला काही माहिती दिली. तो म्हणाला, सगळे प्रयत्न फक्त आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा तपास दुसरीकडे वळविण्यासाठी सुरू आहेत. प्रत्यक्षात माझ्याच जीवाला धोका आहे.



आर्यन खानला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक करण्यास मी कारणीभूत ठरलो आहे. त्यामुळे मला धमक्यांचे फोन येत आहेत. मी महाराष्ट्राबाहेर अर्धा तासात शरण येणार आहे, अशी माहिती किरण गोसावी याने एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.

तर पुणे पोलीस किरण गोसावीच्या मागावर आहेत. त्याचा नेमका ठावठिकाणा उघड करता येणार नाही. पोलीसांची टीम अजूनही त्याचा शोध घेत आहे. पण त्याच्या शरणागती विषयी मीडियात बातम्या असल्या तरी पोलीसांकडे त्याची काही माहिती नाही, असे फरासखाना पोलीस स्टेशनचे एसीपी सतीश गोवेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Aryan Khan drugs case; Narcotics Control Bureau witness Kiran Gosavi claims

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात