सावधान ! तुळजाभवानी मंदिराच्या बोगस वेबसाईट! श्रद्धेच्या नावाखाली घातला जातोय डिजिटल गंडा

विशेष प्रतिनिधी

तुळजापूर : राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव (Corona Pandyamic) कमी झाल्याचं चित्र आहे. कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूदर देखील कमी झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने (Maharashtra Government) कोरोना निर्बंध आणखी शिथिल केले आहे. घटस्थापनेपासून (Ghatsthapana 2021) राज्यातील सर्व मंदिरं उघडण्याची (Temple Reopen in Maharastra) राज्य सरकारने परवानगी दिली. परंतु श्रद्धेच्या नावाखाली राज्यातील लाखो भाविकांना डिजिटल गंडा (Digital Fraud) घातला जात असल्याती धक्कादायक बाब समोर आली आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानीची (Tuljabhavani) बनावट वेबसाईट तयार करुन भक्तांना गंडा घातला जात आहे. A shocking case of cheating the devotees of Tulja Bhavani, the cousin of Maharashtra, has come to light.



साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी अ सलेल्या आई तुळजाभवानीच्या भविकांना फसवण्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. तुळजाभवानी मंदिराची www.shrituljabhavani.org ही अधिकृत वेबसाईट आहे. अज्ञात भामट्यानं www.tuljabhavani.in या नावानं बोगस वेबसाईट सुरू केल्याची माहिती मिळाली आहे. या वेबसाईटवरून तुळजाभवानी दर्शन (Tuljabhavani Darshan), अभिषेक, प्रसाद, पूजा, जागरण गोंधळ यासाठी भक्तांकडून पैसे वसूल केले जात आहेत.
धक्कादायक म्हणजे, इंटरनेटवर तुळजाभवानी टेम्पल (Tuljabhavani Temple) असा सर्च केल्यावर विकीपिडीयामध्ये जी माहिती उपलब्ध होते, त्यामध्ये बोगस वेबसाईटची लिंक देण्यात आली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात भाविकांची फसवणूक होत असल्याची माहिती समोर येत आहे.

एक नव्हे तर 4 बोगस वेबसाईट..

तुळजाभवानीच्या नावे एक नव्हे तर 4-4 बोगस वेबसाईट सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. सायबर पोलिसांकडे याबाबतचे अहवाल देण्यात येईल, असं तहसीलदार रोहन शिंदे यांनी माहिती दिली आहे. दरम्यान, तुळजाभवानी मंदिर संस्थानने अद्याप याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

A shocking case of cheating the devotees of Tulja Bhavani, the cousin of Maharashtra, has come to light.

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात