Dadasaheb Phalke Award : सुपरस्टार रजनीकांत यांना मिळणार दादासाहेब फाळके पुरस्कार, ट्विटद्वारे दिली ही प्रतिक्रिया


वृत्तसंस्था

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी आज 24 ऑक्टोबर रोजी चेन्नईतील त्यांच्या घराबाहेर माध्यमांची भेट घेतली. त्यांनी प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पत्रकारांशी संवाद साधला. या भेटीत या त्यांनी सांगितले की, हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळण्याची मला अपेक्षा नव्हती. हा पुरस्कार स्वीकारताना पाहण्यासाठी गुरू केबी (के बालचंदर) सर हयात नाहीत याचे मला दुःख आहे, असेही त्यांनी सांगितले.superstar rajinikanth reaction on winning dadasaheb phalke award

प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, “दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचा मला खूप आनंद झाला आहे. मला हा पुरस्कार मिळेल अशी अपेक्षाही केली नव्हती. मला हा पुरस्कार मिळाला तेव्हा केबी सर (के बालचंदर) हयात नाही याचे मला दुःख आहे. ” मीडिया रिपोर्ट्सनुसार, रजनीकांत उद्या दिल्लीत होणाऱ्या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहून पुरस्कार स्वीकारणार आहेत.एप्रिल २०२१ मध्ये केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी जाहीर केले की, सुपरस्टार रजनीकांत यांना गेल्या चार दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, कोविड-19च्या साथीमुळे पुरस्कार सोहळ्याला विलंब झाला.

रजनीकांत पद्मभूषण आणि पद्मविभूषणने सन्मानित

भारतातील सर्वात लोकप्रिय स्टार्सपैकी एक, रजनीकांत यांना भारत सरकारने 2000 मध्ये पद्मभूषण आणि 2016 मध्ये पद्मविभूषण देऊन सन्मानित केले आहे. रजनीकांत यांनी अपूर्व रागंगल या चित्रपटातून तमिळ चित्रपटसृष्टीत पदार्पण केले.

त्याच्या अनेक हिट चित्रपटांमध्ये ‘बाशा’, ‘शिवाजी’ आणि ‘एन्थिरन’ सारखे चित्रपट आहेत. ते त्यांच्या चाहत्यांमध्ये थलाईवर (नेता) म्हणून ओळखले जातात.दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारतातील चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान आहे.

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या चित्रपट महोत्सव संचालनालयाद्वारे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसह तो दिला जातो. हा पुरस्कार अभिनेत्री देविका राणी यांना प्रथम देण्यात आला होता. अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, चित्रपट निर्माते के. विश्वनाथ आणि मनोज कुमार यांनाही हा सन्मान मिळालेला आहे.

superstar rajinikanth reaction on winning dadasaheb phalke award

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*