वृत्तसंस्था
मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईत ड्रग्ज विरोधात मोठ्या कारवाया केल्या आहेत. परंतु त्याच्यावर राजकीय पक्षांकडून मोठ्या प्रमाणात टीका टिपण्या झाले आहेत. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पाठोपाठ आता मुंबई पोलिस देखील ड्रग्स विरोधात उतरले यातून उतरले असून त्यांनी देखील मोठी कारवाई केली आहे. मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरॉइन जप्त केले आहे. Following the Narcotics Control Bureau, Mumbai Police also took major action against drugs
अभिनेता सुशांत सिंह रजपूत याच्या संशयास्पद आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आलेल्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने मुंबईत अमली पदार्थाचे रॅकेट उद्धवस्त केले आहे. बॉलिवूडमधील मोठमोठ्या व्यक्तींवर कारवाई केली. सध्या किंग खानचा मुलगा आर्यन खान गजाआड आहे. त्यामुळे राज्याचे अमली पदार्थ विरोधी पथक काय करते, झोपा काढते का, अशी टीका भाजपाचे नेते वारंवार करतात. त्याचा प्रतिवाद नवाब मलिक यांनी केला आहे. अखेर राज्याच्या ड्रग्ज विरोधी पथकाने २१ कोटींचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
मुंबई पोलिसांच्या अँटी नार्कोटिक्स पथकाने सायन परिसरात मोठी कारवाई केली. पोलिसांनी एका ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिच्याकडून तब्बल ७ किलो हिरोइन जप्त केले. गेल्या काही दिवसांत मुंबई पोलिसांकडून ही सर्वात मोठी कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या हिरोइनची किंमत तब्बल २१ कोटी इतकी आहे. पोलिसांनी संबंधित ड्रग्स तस्कर महिलेला अटक केली असून तिची कसून चौकशी करण्यात येत आहे. संबंधित ड्रग्स प्रकरणाचे धागेदोरे राजस्थानातील प्रतापगढ परिसराशी जुळल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. दोनच आठवड्यांपूर्वी या आझाद मैदान पोलिस ठाण्यातील ड्रग्ज विरोधी पथकाने कारवाई करून १६ कोटी रुपयांचा अमली पदार्थांचा साठा जप्त केला होता.
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या वाढत्या कारवायाची दखल महाविकास आघाडी सरकारने राजकीय पातळीवर गंभीरतेने घेतली आहे. या कारवाया बनावट असतात, चिमूटभर ड्रग्स पकडून एनसीबी गवगवा करते, त्या तुलनेत मुंबई पोलिसांच्या कारवाया मोठ्या असतात, त्याचा मुंबई पोलिस गवगवा करत नाहीत, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले होते. त्यानंतर लागलीच मुंबईच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई करून २१ कोटींचा साठा जप्त केला. तसेच त्याची माहितीही माध्यमांना देणार आहेत. अशा रीतीने आता ड्रग्ज विरोधी कारवाईत मुंबई पोलिस नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या विरोधात स्पर्धेत उतरले आहे का, अशी चर्चा सुरु झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App