कोरोना महामारीतून सावरलेली चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. ताज्या अहवालानुसार नवीन तिमाहीत चीनच्या आर्थिक प्रगतीला पूर्णविराम लागला आहे. असे सांगितले जातेय की, बांधकाम कामांतील मंदी आणि ऊर्जेच्या वापरावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चीनची आर्थिक प्रगती ठप्प झाली. China Economy sank after construction slowdown and power cuts
वृत्तसंस्था
बीजिंग : कोरोना महामारीतून सावरलेली चीनची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडली आहे. ताज्या अहवालानुसार नवीन तिमाहीत चीनच्या आर्थिक प्रगतीला पूर्णविराम लागला आहे. असे सांगितले जातेय की, बांधकाम कामांतील मंदी आणि ऊर्जेच्या वापरावर लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चीनची आर्थिक प्रगती ठप्प झाली.
जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था केवळ सप्टेंबरअखेरपर्यंत 4.9 टक्के दराने वाढू शकते. तर पूर्वी हा आकडा 7.9 टक्क्यांपर्यंत होता. सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीमध्ये ही माहिती मिळाली आहे. कारखान्याचे उत्पादन, किरकोळ विक्री आणि बांधकामातील गुंतवणुकीमुळे चीनला अशा गंभीर संकटाला सामोरे जावे लागले आहे.
रॉयटर्स या वृत्तसंस्थेनुसार, अशी अपेक्षा होती की हा आकडा 5.2 टक्क्यांपर्यंत असेल. परंतु चीनची अर्थव्यवस्था या आकड्याला स्पर्श करण्यात अपयशी ठरली आहे. सप्टेंबरमध्ये औद्योगिक उत्पादन अपेक्षित 4.5 टक्क्यांच्या तुलनेत केवळ 3.1 टक्क्यांनी वाढू शकले. बांधकाम हा चीनमधील उद्योग आहे जो लाखो लोकांना रोजगार देतो. या क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी सरकारने अनेक प्रकारची नियंत्रणे लादली होती आणि यामुळे त्याचा लक्षणीय परिणाम झाला होता. चीनकडून कर्जावर कंपन्यांचे अवलंबित्व कमी करण्यासाठी अलीकडेच एक नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. याचा परिणाम असा झाला की, देशातील दुसरी सर्वात मोठी रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कंपनी एव्हरग्रांडे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे.
याशिवाय सप्टेंबर महिन्यात उत्पादन क्षेत्रावर लक्षणीय परिणाम दिसून आला आहे. अनेक प्रांतांमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे त्यांना निर्मितीचे लक्ष्य गाठण्यात अपयश आले आहे. वीज संकटामुळे देशातील अनेक भागातील कारखान्यांना काम बंद करावे लागले आहे. तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की चीन हा जागतिक पुरवठा साखळीचा एक महत्त्वाचा भाग आहे आणि जर ऊर्जा संकटावर लवकरच उपाय सापडला नाही तर अर्थव्यवस्थेची परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते.
चीनच्या राष्ट्रीय सांख्यिकी विभागाने सोमवारी पत्रकार परिषदेत अधिकृत निवेदन जारी केले आहे. विभागाचे प्रवक्ते फू लिंगहुई म्हणाले, “अर्थव्यवस्थेने तिसऱ्या तिमाहीत प्रवेश केल्यापासून देशांतर्गत आणि परदेशी आव्हाने लक्षणीय वाढली आहेत.”
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App