विशेष प्रतिनिधी
नागपूर : शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कुठलाही नवा अजेंडा जनतेसाठी मांडला नाही. ते महाराष्ट्राच्या प्रश्नांना हात लावतील असे वाटले होते. महिलांवरील अत्याचार वाढत चालले त्याबद्दल काय करणार सांगतील असे वाटले होते, पण त्यांनी केवळ फडणवीसांवर बाण सोडले. शेतकऱ्यांचा आक्रोश चालू त्यावर काय करणार आहेत हे न सांगता महाराष्ट्राचा बंगाल करू असे वक्तव्य केले यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात सुरवातीपासूनच उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संघ आणि भाजपावर टीका करताना दिसले. पण दुसरीकडे दिवसाढवळ्या बंगालमधील हिंदूंवर अत्याचार ज्यांच्या कार्यकर्त्यांनी केले त्या ममता बॅनर्जी यांचे मात्र उद्धव ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केले. तर महाराष्ट्रही बंगालच्या वाटेने गेला पाहिजे असे धक्कादायक विधानही त्यांनी केले.
फडणवीस म्हणाले, “तुम्ही ज्या आविर्भावात सांगताय की जनतेने भाजपला नाकारलं. तर नव्हे, जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला नाकारलं आणि तुम्हाला वरपास केलं. त्यामुळे हे बेईमानीने तयार झालेले सरकार आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी भाबडेपणाचा मुखवटा बाजूला सारुन सांगावं की त्यांना मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा होती आणि ती पूर्ण केली. दिलेला शब्दच जर पूर्ण करायचा होता तर इतर कोणा शिवसैनिकाला मुख्यमंत्री करता आलं असतं.
सुभाष देसाई, दिवाकर रावते होते. मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा नव्हती तर नारायण राणे, राज ठाकरेंना का बाहेर जावं लागलं? मुख्यमंत्री म्हणाले की आम्हाला महाराष्ट्राचा बंगाल करायचाय, म्हणजे नक्की काय करायचंय? खंडणीबाजीमुळे बंगालमध्ये एकही उद्योग टिकलेला नाही. तुमच्या विरोधात जो बोलेल त्याचे हात पाय तोडून त्याला फासावर लटकवायचा असा महाराष्ट्र घडवायचा आहे का? आमच्यात जोवर रक्ताचा एक थेंब आहे तोवर आम्ही, महाराष्ट्राचा बंगाल होऊ देणार नाही. महाराष्ट्र महाराष्ट्रच राहील”.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App