वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईत अकरावी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनाही लोकलप्रवासाची मुभा देण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवली, वसई-विरार अशा दूरच्या विद्यार्थ्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे.Now, students under the age of 18 will also get permission to travel in Local
लोकलसेवा सुरू केल्यानंतर प्रथम अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर दोन लसी घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून परवानगी दिली. तसेच लसीचे दोन डोस घेऊन १४ दिवस पूर्ण झाले आहेत, अशा प्रवाशांना रेल्वे प्रवासासाठी पास देण्यास सुरुवात केली.
Mumbai lifeline : सर्वसामान्यांना 15 ऑगस्टपासून लोकल रेल्वे प्रवासाची मुभा ; असा मिळवा Local Offline Pass …
आता १८ वर्षांखालील मुलांनाही लोकल प्रवास करता येणार आहे. तसेच काही आरोग्याच्या कारणांमुळे ज्यांना लस घेता येत नाही, अशांनाही रेल्वे प्रवासासाठी तिकीट मिळणार आहे. अशा लोकांनी तिकीट काढताना डॉक्टरांचे तसे प्रमाणपत्र सादर करणे गरजेचे आहे.
वैद्यकीय कारणांसाठी एखाद्याला लोकल प्रवास करता येईल. त्यासाठीही डॉक्टरांचे प्रमाणपत्र हा पुरावा दाखवताच मासिक पास देण्यात येईल, असे रेल्वेने सांगितले. रेल्वे मासिक पास घेण्यासाठी तिकीट खिडक्यांवर १८ वर्षांवरील विद्यार्थ्यांना पुरावा म्हणून ओळखपत्र दाखवावे लागेल. प्रवासावेळी पास आणि ओळखपत्रही सोबत बाळगणे बंधनकारक आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App