वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाचे पाऊल उचलले असून सीमावर्ती राज्यांमध्ये BSF म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे कार्यक्षेत्र वाढविले आहे. भारताच्या सीमेअंतर्गत ५० किलोमीटर परिसरात सीमा सुरक्षा दल आता शस्त्रास्त्र आणि ड्रग्जच्या तस्करीचा विरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करतील. आतापर्यंत सीमा सुरक्षा दलाचे हे कार्यक्षेत्र फक्त १५ किलोमीटर परिसरापर्यंत होते. ते वाढवून ५० किलोमीटर परिसरापर्यंत करण्यात आले आहे. BSF Gets Increased Powers In 3 Border States: What It Means
बीएसएफचे जवान ड्रग्ज आणि शस्त्रास्त्रांची तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी विरूद्ध सीमावर्ती भागात कारवाई करू शकतात. केंद्रीय गृह मंत्रालयाने सीमा सुरक्षा दलाचे (BSF) कार्यक्षेत्र वाढवले आहे. सीमा सुरक्षा दल गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार भारताच्या जमिनीवरील सीमांचे रक्षण करते. बीएसएफ अधिका-यांना पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या राज्यांमध्ये शोध, अटक आणि जप्तीचे अधिकार गृह मंत्रालयाने दिले आहेत. यामुळेच आता बीएसएफचे अधिकारी, राज्य पोलिसांप्रमाणे कारवाई करू शकतात.
या अंतर्गत बीएसएफ अधिकारी पश्चिम बंगाल, पंजाब आणि आसाम या तीन राज्यांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान या देशांच्या सीमेपासून ५० किलोमीटर आतपर्यंत कारवाई करू शकतील, याआधी ही मर्यादा १५ किलोमीटर एवढी होती. पासपोर्ट कायदा, एनडीपीएस कायदा, सीमाशुल्क कायदा तसेच फौजदारी प्रक्रिया यासारख्या कायद्यांतर्गत शोध, जप्ती आणि अटक करण्याचे अधिकार बीएसएफ अधिका-यांना मिळणार आहेत. या निर्णयामुळे बीएसएफचे जवान अंमली पदार्थ किंवा शस्त्रास्त्रांची तस्करी आणि बेकायदेशीर घुसखोरी विरूद्ध सीमावर्ती भागात कारवाई करू शकतात.
गुजरात राज्यात अंतर्गत सीमाक्षेत्र ८० किलोमीटरवरून कमी करून ५० किलोमीटर करण्यात आले आहे. राजस्थानमधील सीमाक्षेत्रात कोणताही बदल केला नसून, ईशान्येकडील मेघालय, नागालँड, मिझोराम, त्रिपुरा आणि मणिपूर या राज्यांसाठी कोणतीही मर्यादा निर्धारित केलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App