Congress & RSS : बिनचूक सल्ला; अचूक आत्मपरीक्षण…!!; पण अंमलबजावणी…??

आज दिवसभरातल्या महाराष्ट्र बंद आणि लखीमपूर या बातम्यांमुळे दोन महत्त्वाचे विषय झाकोळले गेले. पहिला विषय लखीमपूरशी संबंधित असला तरी प्रामुख्याने तो काँग्रेस संघटनेशी संबंधित आहे, तर दुसरा विषय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेCan Congress and RSS make changes according to the times and expected line of the society??

लखीमपूरच्या हिंसक घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने आपल्याला वाहून जाऊ देऊ नये, असा सल्ला ज्येष्ठ पत्रकार विनोद शर्मा यांनी काँग्रेसच्या नेतृत्वाला म्हणजे प्रियांका आणि राहुल गांधी यांना उद्देशून दिला. पण हा सल्ला एवढ्यापुरताच मर्यादित नाही. त्यांनी काँग्रेसमध्ये संरचनात्मक बदल करण्याची आग्रही सूचना केली आहे. किंबहुना काँग्रेसमध्ये लोकशाहीकरण झाले पाहिजे ही त्यांची महत्त्वाची सूचना आहे आणि नेमकी इथेच विनोद शर्मा यांच्या सूचनेतली “राजकीय मेख” दडलेली आहे…!!

काँग्रेस पक्षाने संरचनात्मक बदल करायचे म्हणजे नेमके काय करायचे? काँग्रेसमध्ये विविध स्तरांवर असलेल्या नेत्यांना अधिकार प्रदान करायचे? त्यांना निर्णय घेण्याची मुभा द्यायची? की आपले अधिकार गांधी कुटुंबीयांनी अन्य कोणाला प्रदान करायचे?

काँग्रेसमध्ये लोकशाहीकरण करणे म्हणजे एक प्रकारे गांधी कुटुंबीयांनी स्वतःचे अधिकार कमी करून काँग्रेसच्या इतर कोणत्याही निष्ठावान नेत्याला प्रदान करणे हेच होय…!! किंबहुना विनोद शर्मा यांनी केलेली संरचनात्मक बदलाची सूचना नेमकी हीच आहे.

अर्थात एका अर्थाने ती नवीन देखील नाही. कारण काँग्रेसमधल्या जी 23 गटाच्या नेत्यांनी वेगळ्या भाषेत विनोद शर्मा यांच्या आधीच या सूचना काँग्रेस नेतृत्वाला म्हणजे गांधी कुटुंबीयांना करून झाल्या आहेत. परंतु त्यांची अंमलबजावणी अद्याप काँग्रेस मध्ये झालेली दिसलेली नाही. याचा अर्थ काँग्रेस मध्ये काहीच घडत नाही, असाही नाही. काँग्रेसमध्ये काही प्रमाणात बदल घडतो आहे. तो विनोद शर्मा किंवा जी 23 नेत्यांच्या अपेक्षे बरहुकूम नसेल कदाचित, पण कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांच्यासारख्या विद्यार्थी नेत्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश देऊन राहुल गांधींनी त्यांना हवा तसा बदल घडविण्याचा प्रयत्न केला आहे.



प्रियांका गांधी यांनी लखीमपूर हिंसाचाराच्या घटनेचे अचूक टायमिंग पकडून अखिलेश यादव यांच्यावर राजकीय मात केल्याची कबुली स्वतः विनोद शर्मा यांनीच हिंदुस्तान टाइम्सच्या लेखात दिली आहे. पण प्रश्न त्याच्यापुढचा आहे. त्याचाही उल्लेख शर्मा यांनी केला आहे, तोच नेमका काँग्रेसमधल्या संरचनात्मक बदलाचा आहे. विनोद शर्मा किंवा जी 23 चे नेते हे काँग्रेसमधल्या बदलाचे कार्यवाहक नाहीत. जे काही करायचे आहे ते या दोघांनाही मान्य असो अथवा नसो ते आज गांधी कुटुंबीयांना करायचे आहे आणि गांधी कुटुंबीय आपल्याला हवे तसे निर्णय घेऊन काँग्रेसला वळण देण्याची देण्याचे मनसुबे आखताना दिसत आहेत. अशा स्थितीत विनोद शर्मा यांना अपेक्षित असणारे काँग्रेसचे लोकशाहीकरण शक्य नाही.

– सरसंघचालकांचे आत्मपरीक्षण

जे काँग्रेसचे, तेच संघाचे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उत्तराखंडात एका कार्यक्रमात बोलताना संघाच्या कार्यक्रमांमध्ये 50 % महिलांचा सहभाग हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे संघ आत्ता 95 वर्षांचा आहे. मग संघाने आतापर्यंत काय केले? महिलांचा सहभाग संघाच्या कार्यक्रमांमध्ये का वाढवला नाही?, हे प्रश्न खोचक आहेत. या प्रश्नांची उत्तरे संघाने कधी दिली नाहीत, असेही नाही. संघाचे पदाधिकारी अशा प्रश्नांवर राष्ट्र सेविका समितीकडे बोट दाखवतात. यातही काही गैर नाही. कारण राष्ट्रसेविका समिती देखील मोठ्या प्रमाणावर काम करते ही वस्तुस्थिती आहे. पण तरीही सरसंघचालकांना संघामध्ये संघाच्या कार्यक्रमांमध्ये महिलांचा 50 % सहभाग हवा असे का म्हणावेसे वाटते? संघाच्या निर्णय प्रक्रियेत आणि कार्यक्रमांमध्ये महिलांचे प्रमाण कमी आहे हे 95 वर्षांनंतर समजले? की आता संघाची व्यापकता एवढी वाढली आहे की आता संघाला आपल्या कार्यक्रमांमध्ये आणि निर्णय प्रक्रियेमध्ये महिलांचा सहभाग वाढवावासा वाटतो?, याचा तपशीलवार खुलासा सरसंघचालकांनी केलेला दिसत नाही. पण तरी देखील सरसंघचालकांचे हे परखड आत्मपरीक्षण आहे असे मानायला हरकत नाही.

एरवी राजकीय पक्ष महिलांचा सहभाग राजकारणात वाढविण्याविषयी भरपूर गप्पा मारत असतात. परंतु राजकारणात महिलांना संधी द्यायची म्हटली की ते आपल्या लेकी – सुनांना पुढे करतात. ही राजकीय वस्तुस्थिती आहे.

या पार्श्वभूमीवर सरसंघचालकांचे आत्मपरीक्षण आपल्याकडच्या राजकीय पक्षांपेक्षा निश्चितच प्रामाणिक आहे. पण फक्त संघाच्या कार्यक्रमात महिलांचा 50 % सहभाग यायला हवा एवढ्यापुरते बोलून भागणार नाही. तशी प्रत्यक्ष कृती करावी लागेल. संघ स्वयंसेवकांमध्ये पठडी बाहेर जाऊन त्या पद्धतीचे संस्कार घडवावे लागतील. हे संघ करायला तयार आहे का?

सरसंघचालकांनी याच भाषणात देशातल्या कुटुंब व्यवस्थेवर देखील मौलिक भाष्य केले आहे. तेही तितकेच योग्य आहे किंबहुना कुटुंब व्यवस्था आणि महिलांचा सहभाग या दोनही बाबींचा एकमेकांशी अन्योन्यसंबंध आहे. आपल्या कुटुंब व्यवस्थेत महिलांचा सहभाग जसा वाढतो आहे तसा तो संघात वाढला पाहिजे अशी अपेक्षा जर सरसंघचालकांची असेल तर ती देखील योग्य आहे. पण त्याच वेळी महिलांचा सहभाग कुटुंबाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत वाढला आहे तसाच तो संघाच्या महत्त्वाच्या निर्णय प्रक्रियेत देखील (केवळ राष्ट्रसेविका समिती आणि दुर्गा वाहिनीच्या नव्हे) वाढणार आहे का? हा देखील कळीचा मुद्दा आहे…!!

एकूण, काँग्रेस बाबत विनोद शर्मा यांनी दिलेला सल्ला बिनचूक पण अमलात आणायला महाकठीण तसेच सरसंघचालकांचे आत्मपरीक्षण अचूक पण अमलात आणायला कसे…?? या प्रश्नाचे उत्तर संघाला भविष्यात द्यावे लागेल…!! संघ ते उत्तर देईल…??

Can Congress and RSS make changes according to the times and expected line of the society??

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात