विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : आपल्या घरी हातात झाडू घेऊन घर स्वच्छ करणे हे काम भारतातील प्रत्येक कुटुंबात होत असते, ही आपली संस्कृतीच आहे. प्रियांका यांच्याकडून हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. अन्यथा कुणी छायाचित्रकार तिथे कसा काय पोहोचू शकतो, असा सवाल आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी केला आहे.Hemant Biswa Sharma’s Criticism of Priyanka Vadhera, It is Indian culture to sweep the house, I have seen my mother sweeping many times
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीस प्रियांका वढेरा यांनी हातात झाडू घेऊन झाडझूड करण्याच्या राजकीय प्रकारावर सरमा यांनी टीका करताना म्हटले आहे की, झाडूने स्वच्छता करणे ही बातमी कशी काय असू शकते.
कारण, भारतातील प्रत्येक कुटुंबात ही कृती केली जाते. प्रियांका यांच्याकडून हा प्रकार जाणीवपूर्वक करण्यात आला आहे. अन्यथा कुणी छायाचित्रकार तिथे कसा काय पोहोचू शकतो. मी माझ्या आईला हे काम करताना बघितले आहे. तुम्ही सुद्धा आपल्या आईला हे काम केल्याचे बघितले असेल.
उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खिरी येथील घटनेनंतर सोमवारी प्रियांका वढेरा यांनी पीडितांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना अटक करण्यात आली होती. अतिथीगृहात असताना त्यांनी आपल्या खोलीत झाडझूड केल्याचे छायाचित्र आणि छायाचित्रण समाजमाध्यमात पसरले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App