विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली –केवळ फटाक्यांची मोठी आतषबाजी म्हणजे उत्सव नव्हे, उत्सव साजरा करण्यास आमचा विरोध नाही पण त्यामुळे लोकांचा जीव धोक्यात घातला जाऊ नये, हरित फटाक्यांच्या नावाखाली काही फटाके उत्पादकांकडून बंदी घालण्यात आलेल्या कानठळ्या बसविणाऱ्या फटाक्यांची सरसकट विक्री होताना दिसते असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.Don’t use fire crackere in Diwali – Court
न्या. एम.आर. शहा आणि न्या.ए.एस.बोपन्ना यांच्या खंडपीठाने हे निर्देश दिले. न्यायालय म्हणाले की,‘‘ केवळ फटाक्यांची मोठी आतषबाजी म्हणजे उत्सव नव्हे, तुम्ही आवाज न करणाऱ्या फुलबाजीच्या माध्यमातून आनंद घेऊ शकता.
आम्ही याआधी दिलेल्या आदेशांची सर्वच राज्यांनी अंमलबजावणी करावी. तुम्ही कोणत्याही राज्यात अथवा शहरामध्ये जा किंवा उत्सावात सहभागी व्हा, तिथे तुम्हाला अशा फटाक्यांची बाजारात उघडपणे विक्री होत असल्याचे दिसून येते. याबाबत आम्ही दिलेल्या आदेशांची पालन होणे गरजेचे आहे. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ ऑक्टोबर रोजी होईल.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App