विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – नीट या सुपर स्पेशालिटी परीक्षेसाठी सुधारित पॅटर्नची पुढील वर्षीपासून (२०२२) अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात दिली.NEET will be happened on old pattern
केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर यांनी खंडपीठाला सांगितले की, ‘‘उमेदवारांचे व्यापक हित डोळ्यासमोर ठेवून आम्ही यंदापासून (२०२१) परीक्षेच्या सुधारित पॅटर्नची अंमलबजावणी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
यंदा जुन्या पॅटर्ननुसारच ही परीक्षा घेतली जाईल.’’ सर्वोच्च न्यायालयाने देखील आपल्या आदेशांत हे नोंदविताना याबाबतची याचिका निकाली काढली.मुळात यंदा ही परीक्षाच जर जुन्या पॅटर्ननुसार घेतली जाणार असेल तर सुधारित पॅटर्नच्या वैधतेवर आदेश देण्यात फारसा अर्थ नसल्याचेही न्यायालयाने म्हटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाने याप्रकरणी मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान संबंधित यंत्रणेने पुढील वर्षीपासून नव्या पॅटर्नची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला तर आभाळ कोसळणार नाही असे सुनावतानाच यंदासाठी जुन्या पॅटर्ननुसारच परीक्षा घेतल्या जाव्यात असे म्हटले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App