वृत्तसंस्था
स्टॉकहोम : महंमद पैगंबर यांचे व्यंगचित्र काढणारे स्वीडिश व्यंगचित्रकार लार्स विलक्स यांचा कार अपघातात संशयास्पद मृत्यू झाला आहे. त्यांची कार समोरून येणाऱ्या मोठ्या ट्रकला धडकली. कारने पेट घेतला आणि त्यात लार्स यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासमवेत त्यांच्या दोन सुरक्षा रक्षक पोलीस कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे.Lars Vilks: Muhammad cartoonist killed in traffic collision
आज झालेल्या अपघातात त्यांची कार समोरून येणाऱ्या ट्रक वर धडकल्याचे सांगण्यात येते. कारने पेट घेतला. यामध्ये ट्रकचालकाचाही मृत्यू झाला. त्यामुळे संशय वाढला आहे. या अपघाताची सखोल चौकशी करून यामागे कोणता घातपात नाही ना, याचा तपास करण्यात येईल, असे स्वीडिश पोलीस प्रमुखांनी स्पष्ट केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App