विशेष प्रतिनिधी
हैदराबाद : बाहुबली चित्रपटाचे दिग्दर्शक एस एस राजामौली यांचा ट्रिपल आर हा सिनेमा बऱ्याच कालावधीपासून प्रदर्शित होणार अशी चर्चा चालू होती. आता या सिनेमाची फायनल रिलीज डेट समोर आली आहे. 7 जानेवारी 2022 रोजी हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित होईल.
January 7, 2022 : New release date of SS Rajamouli’s much awaited film RRR
एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट अशी तगडी स्टारकास्ट या सिनेमामध्ये एकत्र काम करताना पाहायला मिळणार आहे. त्यामुळे चाहते एकदम खुश आहेत. एनटीआर आणि राम चरण या दोघांनी या सिनेमात फ्रीडम फायटर चा रोल प्ले केला आहे. तर अजय देवगण ही एका प्रमुख आणि महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. आलीय भट्टने सीता नावाचे पात्र ह्या सिनेमात निभावले आहे. हा सिनेमा आधी 13 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोना आणि सध्याची परिस्थिती लक्षात घेता या सिनेमाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे.
Experience India’s Biggest Action Drama, #RRRMovie in theatres worldwide on 7th Jan 2022. 🤟🏻#RRROnJan7th 💥💥 An @ssrajamouli Film. @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @aliaa08 @oliviamorris891 @RRRMovie @DVVMovies @PenMovies @jayantilalgada @LycaProductions pic.twitter.com/wKtnfeCJN7 — RRR Movie (@RRRMovie) October 2, 2021
Experience India’s Biggest Action Drama, #RRRMovie in theatres worldwide on 7th Jan 2022. 🤟🏻#RRROnJan7th 💥💥
An @ssrajamouli Film. @tarak9999 @AlwaysRamCharan @ajaydevgn @aliaa08 @oliviamorris891 @RRRMovie @DVVMovies @PenMovies @jayantilalgada @LycaProductions pic.twitter.com/wKtnfeCJN7
— RRR Movie (@RRRMovie) October 2, 2021
2022 मध्ये प्रदर्शित होणार आलीया भट्टचा ‘गंगुबाई काठियावाडी’ सिनेमा
या सिनेमाची स्टोरी के विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली आहे. तर सिनेमासाठी म्युझिक एम एम कीरावाणी यांनी दिले आहे. या सिनेमासाठी 400 करोड रूपये खर्च करण्यात आले आहेत. बाहुबली सिनेमातील सेट्स आणि भव्यता लक्षात घेता, एस एस राजमौली यांचा हा सिनेमा देखील हटके असणार हे नक्की. हा बिग बजेट सिनेमा कधी प्रदर्शित होतोय याची चाहत्यांना उत्सुकता होती. आणि आता प्रदर्शनाची तारीख जाहीर झाल्यामुळे चाहते नक्किच खुश असणारेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App