विशेष प्रतिनिधी
इस्लामाबाद: पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती खालावली असल्याने आता सरकारच भांग विकणार आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी देशातील पहिल्या भांगेच्या शेतीचे उद्घाटन केले.Pakistan to sell cannabis to boost economy by raising money, first cannabis minister inaugurated
भांग हा एक प्रकारचा मादक पदार्थ असतो. मात्र, जगातील अनेक देशांमध्ये याचा वापर औषध म्हणून केला जातो. पाकिस्तान सरकार भांगेच्या शेतीला प्रोत्साहन देणार आहे. जेणेकरून या माध्यमातून त्यांना मोठ्या प्रमाणावर महसूल मिळवता येणे शक्य होईल, असे फवाद चौधरी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तान कोट्यवधी डॉलरच्या भांग उद्योगात मोठी भूमिका बजावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देशाची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २.७५ अब्ज डॉलरचे (जवळपास २० हजार कोटी रुपये) कर्ज घेतले आहे.
पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती ढासळत असून इम्रान खान सरकार आर्थिक आघाडीवर अपयशी ठरले असल्याची टीका विरोधकांनीही केली आहे. सध्या दर पाकिस्तानी नागरिकावर एक लाख ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App