विशेष प्रतिनिधी
दिल्ली : भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने ‘युथ एम्प्लॉयमेंट प्रोग्राम’ द्वारे भारतातील तरुण वर्गाला तसेच कोरोना काळामध्ये बेरोजगार झालेल्या लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रोग्राम चालू केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत टीसीएस कंपनीमध्ये काम करणाऱ्या अनुभवी ट्रेनरद्वारे बेसिक प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
Job alert : TCS introduces Youth Employment Program
यूथ एम्प्लामेंट प्रोग्राम सुरू झाल्यापासून १,२४,००० इतक्या लोकांनी या प्रशिक्षणाचा फायदा घेतला आहे. या प्रोग्राममुळे २४,८०० लोकांना प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब मिळवण्यात यश मिळले आहे. तर बाकी १३,८०० प्रशिक्षणार्थींना स्वतः टीसीएस कंपनीने हायर केले आहे. ज्या विद्यार्थ्यांचे आयटी बॅकग्राउंड नाही, अशा एकूण ९२०० विद्यार्थ्यांनी हे प्रशिक्षण घेतले होते.
Government Job 2021 : संरक्षण मंत्रालयात नोकरीची सुवर्णसंधी, दहावी पासही करू शकतात अर्ज
टीसीएस कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी रेफर केलेल्या एकूण १३८४ पैकी ७०० हून अधिक लोकांना टीसीएस कंपनीने हायर केले आहे.
या प्रोग्रामद्वारे सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या उपेक्षित समुदायातील लोकांना त्याचप्रमाणे कोरोना काळामध्ये ज्या लोकांची नोकरी केली आहे, जे विद्यार्थी नुकतेच कॉलेजमधून ग्रॅज्युएट होऊन बाहेर पडले आहेत या सर्वांना याचा लाभ व्हावा यासाठी हा प्रोग्राम चालू केला आहे असे टीसीएसने सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App