वृत्तसंस्था
पुणे : आयपीएलवर बेटिंग घेणाऱ्या दोन आंतरराष्ट्रीय बुकींना अटक केल्यानंतर आणखी सनसनाटी माहिती उघड होत आहे. अशोक जैन हा १९९२ पासून क्रिकेट बेटिंग घेत असल्याचे उघड झाले. तो सोन्याच्या व्यवहारातही असल्याचे समजते.Betting on IPL, hawalakand and big racket; Pune police action, sensational information to be revealed
अशोक जैन हा बालाजी या आणखी एका बुकीच्या संपर्कात असलेल्या गिऱ्हाईकांकडून क्रिकेट बेटिंग करीता रक्कम घेऊन पुढे बालाजी व इतरांकडे वळवत असल्याचे आढळून आले. तसेच तो बेटिंग लावण्याकरीता १ रुपयांस एक रुपया या दराने बेटिंग घेत असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत.
विविध ॲपद्वारे घेत होते बेटिंग
गणेश भुतडा याच्या घरात ९२ लाखांची रोकड आढळली. तो बेटिंग वापरत असलेला मोबाईल हा दुसऱ्याच्या नावावर होता. गणेश भुतडा याचा हवाला रॅकेटशी संबंधित असल्याचे सांगण्यात येते, त्यामुळे त्याच्या घरी एकावेळी ९२ लाख रुपये सापडले तरी त ही रक्कम किरकोळ असल्याचे सांगण्यात येते.
मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता
भुतडा याच्या मोबाईलमध्ये रविवारच्या सामन्याच्या २७ चिठ्ठ्या आढळल्या. त्या या चिठ्ठ्या इतर लोकांनी लिहून त्याचे फोटो काढून व्हॉटसॲपवर पाठविले होते. मोबाईल तपासणीत अशा चिठ्ठ्या अनेक दिवसांपासून मोबाईलमध्ये आढळून आल्या.
त्यासमोर पैशांचा हिशेब असलेल्या चिठ्ठ्या संग्रहीत होत्या. मोबईलमध्ये त्यांच्याकडे बेटिंग करणारे आणि त्यांच्याकडून पुढे बेटिंग घेणारे अशा अनेकांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता असून मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App