विशेष प्रतिनिधी
दिल्ली : केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बद्दल एक मोठी घोषणा केली आहे. या घोषणेनुसार कोणत्याही कार उत्पादक कंपन्यांना, ऑटोमोबाईल असोसिएशन तसेच एनजीओज्ना ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याची परवानगी दिली गेली आहे. यापुढे कोणतेही वाहन चालविण्यासाठी तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असने हे अत्यावश्यक झाले आहे. आता तुम्हाला लर्निंग लायसन्ससाठी परिवहन विभागाच्या कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज पडणार नाही. मोठ्या रांगेत दिवसभर उभे राहून लायसन्स साठी त्रासही सहन करावा लागणार नाही.
Central government has announced new rules for driving licence
प्रादेशिक परिवहन विभागाकडून पूर्वीप्रमाणे ड्रायव्हिंग लायसन्स देण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, दिल्ली एनसीआर आणि झारखंड राज्यांमध्ये लर्निंग लायसन्स आणि वाहनांच्या नोंदणीसाठी नवीन नियम लागू केले आहेत. तसेच काही राज्यांमध्ये अजूनही ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारले जातात.
Mask Mandatory while Driving : कारमध्ये एकट्या व्यक्तीनेही मास्क घालणे बंधनकारक, दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
कोरोना नंतर देशातल्या जवळपास सर्व राज्यांच्या परिवहन विभागाचे लर्निंग लायसन्ससाठी फी जमा करण्यासाठी असलेल्या पध्दतीत बदल केला आहे. या नवी पध्दतीनुसार स्लॉट बुकिंग झाल्यावर लगेच लर्निंग लायसन्ससाठी पैसे जमा करावे लागतात. पैसे जमा केल्यानंतर तुमच्या सोयीनुसार तुम्हाला चाचणी परीक्षेकरता तारीख घ्यावी लागते. लायसन्स संबंधित सेवांसाठी तुम्हाला परिवहन विभागाच्या वेबसाइटवर जाऊन गरजेनुसार ड्रायव्हिंग लायसन्स सेवेच्या ऑप्शनवर क्लिक करावं लागतं. फॉर्म भरताना तुम्हाला तुमचा ड्रायव्हिंग लायसन्स क्रमांक आणि वैयक्तिक माहिती द्यावी लागते. तसंच यावेळी ड्रायव्हिंग लायसन्ससाठी आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतील. आरटीओ कार्यालयात बायोमेट्रिक तपशील तपासल्यानंतर तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल आणि त्यानंतरच तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्स रिन्यू केलं जाईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App