ना ना करते युती तुम्ही से कर बैठे!!; भाजपाने मनसेला बिनशर्त स्वीकारले! 

प्रतिनिधी

मुंबई : आमची फक्त चर्चा सुरू आहे. काय होईल माहित नाही. आमचे परप्रांतीयांविषयीचे विचार जुळत नाहीत, वगैरे बाता मारणाऱ्या भाजपने अखेर “ना ना करते युती तुम्ही से कर बैठे”, असे म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी अखेर युती करून घेतली. अर्थात ही राज्यव्यापी युती नसून पालघरच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणूकी पुरती युती आहे. एक प्रकारे दोन्ही पक्षांसाठी ही राजकीय लिटमस टेस्ट आहे. कारण पालघर मध्ये शिवसेना सगळ्यांपेक्षा प्रबळ पक्ष आहे. BJP accepts MNS unconditionally!

पालघरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसोबत भाजपाची युती तेव्हाच होईल जेव्हा मनसे परप्रांतीयांच्या मुद्द्यावरील आग्रही भूमिका सॊम्य करील, असे स्पष्ट मत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडले होते. त्यामुळे भाजपाच्या या अटीशर्तींमुळे भाजपा-मनसे युती होणार नाही, अशी अटकळ होती. मात्र याला छेद देणारी घटना पालघरमध्ये घडली. पालघर येथील जिल्हापरिषदेच्या पोटनिवडणुकीत भाजपाने मनसेला बिनशर्त स्वीकारले आहे. या ठिकाणी भाजपा आणि मनसे यांची युती जाहीर झाली आहे.

पुण्यातही युतीसाठी आग्रह 

पालघरमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणूक होत आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात भाजप आणि मनसे युती झाली आहे. पालघर भाजप अध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही या संदर्भात चर्चा सुरु आहे. दरम्यान पुढच्या वर्षी होणाऱ्या पुन्हा पुणे महापालिका निवडणुकीतही मनसेने भाजपाशी युती करावी, अशी आग्रही भूमिका मनसेच्या स्थानिक नेत्यांनी मनसेच्या पक्ष श्रेष्टींकडे केली आहे. त्यामुळे मनसेला त्याचा फायदा होणार आहे, असे मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी नुकताच पुणे दौरा केला होता. आगामी महापालिका निवडणुकीत पुण्यातील प्रभाग रचनेत बदल होणार आहे. त्यामुळे मनसेला ही निवडणूक जड जाईल, असे मत मनसेच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुणे येथेही मनसे – भाजप यांची युती होणार का, हे पाहावे लागणार आहे.

जर पुणे महापालिका निवडणुकीत मनसे – भाजपा यांची युती झाली तर मात्र मुंबई महापालिकेतही भाजपा – मनसे यांची युती होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. मात्र असे असले तरी मनसेने त्यांचा परप्रांतीयांचा मुद्दा सोडल्याचे अजून तरी जाहीर केलेले नाही. त्यामुळे भाजपा-मनसे यांच्या युतीतील भाजपाने तडजोड करत मनसेसाठी टाकलेली अट मागे घेतली का, अशीही चर्चा सुरु झाली आहे.

BJP accepts MNS unconditionally!

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात