विज्ञानाची गुपिते : ज्वालामुखींमुळे पृथ्वीवरील तापमान स्थिर राहण्यास होते चांगलीच मदत


पृथ्वी व सौरमाला यांच्या अनुषंगाने गेल्या काही वर्षांत जे अनेक नवे शोध लागले आहेत, त्‍याने मानवासाठी आश्‍चर्यकारक आहेत. संशोधकांना ज्वालामुखींबाबत काही गोष्टी नव्याने समजल्या आहे. ज्वालामुखी व पृथ्वी यांचा जवळचा संबंध असून वसुंधरेवरील तापमान स्थिर करण्यात ज्वालामुखींची महत्त्वाची भूमिका बजावली आहे, असे निदर्शनास आले आहे. Volcanoes help stabilize the earth’s temperature

साऊथम्पटन विद्यापीठ (ब्रिटन), सिडनी विद्यापीठ (ऑस्ट्रेलिया), ओटावा विद्यापीठ (अमेरिका) आणि लीड्स विद्यापीठ (ब्रिटन) या विद्यापीठांमधील शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यास केला आहे. यासंबंधाचा शोध निबंध ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. गेल्या ४० कोटी वर्षांत पृथ्वी स्थिर होण्याची प्रक्रिया, वातावरण आणि सागर याविषयीचा अभ्यास शास्त्रज्ञांनी केला.

पृथ्वीच्या पृष्ठभागावरील नैसर्गिक अडथळे आणि खडकांचे विघटन करणाऱ्या रासायनिक हवामान प्रक्रिया यावर अभ्यासात भर दिला आहे. या प्रक्रियेतून मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअम यांसारखी घटकांची निर्मिती झाली. नद्यांमार्फत हे घटक समुद्राला जाऊन मिळाले. तेथे पाण्यात त्यांचे खनिजात रूपांतर होऊन ‘सीओ२’ (कार्बन डाय ऑक्साईड) तयार झाला.

या यंत्रणेद्वारे वातावरणातील ‘सीओ२’ आणि भूवैज्ञानिक वेळेनुसार वैश्‍विक तापमानाची पातळी नियमित राखण्यास मदत झाली, असे या लेखात नमूद केले आहे. संशोधनातील निष्कर्ष बरेच रंजक आहेत. ४० कोटी वर्षांतील हवामानाची तीव्रता ज्वालामुखींची साखळी व परिघ यावर अवलंबून आहे.

पृथ्वीवरील वेगाने नष्ट व मोठ्या प्रमाणात नष्ट होणाऱ्या वैशिष्ट्यांपैकी एक ज्वालामुखी आहे. ज्वालामुखींमुळे खनिजे समुद्रात जाऊन मिळाली व तेथील पाण्यात ‘सीओ२’ची निर्मिती झाली. ज्वालामुखींमुळे पृथ्वीवर समतोल साधला जातो. ज्वालामुखींमुळे ‘ ‘सीओ२’ मोठ्या प्रमाणावर तयार होऊन वातावरणात त्याची पातळी वाढते. दुसरीकडे वेगाने होणाऱ्या वातावरण अपक्षयाच्या माध्यमातून कार्बन हटविण्यास काम ज्वालामुखी करतात.

Volcanoes help stabilize the earth’s temperature

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात