वृत्तसंस्था
चंदीगड : प्रभू श्रीराम हे फक्त हिंदूंचेच नसून संपूर्ण जगाचे आहेत, असे जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी सांगितले.Lord Shriram is not only of Hindus but of the whole world, Farooq Abdullah; Anger over BJP about 370
दिवंगत उपपंतप्रधान देवीलाल यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त हरियाणातील जिंद येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
फारुख अब्दुल्ला यांनी शेजारच्या देशांशी मैत्री करण्यावर भर दिला. कलम ३७० रद्द केल्याबद्दल त्यांनी भाजपवर रागराग केला. तसेच “प्रभू श्रीराम हे केवळ हिंदूंचे राम नाहीत. ते पूर्ण जगाचे राम आहे. भाजपाने त्यांना स्वत:चे बनवले आहे, असा आरोप त्यांनी केला.
“अटल बिहारी वाजपेयी म्हणाले होते की आम्ही मित्र बदलू शकतो. पण, शेजारी नाही. आपण आपल्या शेजाऱ्यांशी भांडणं थांबवले पाहिजे. जर तुम्ही तुमच्या शेजाऱ्याशी मित्र राहिलात तर तुम्ही समृद्ध व्हाल. आज आमचे मित्र कुठे आहेत? नेपाळ, भूतान किंवा बांगलादेश आपले मित्र आहेत का? आपण अफगाणिस्तानमध्ये ३ अब्ज डॉलर्स खर्च केले. आज अफगाणिस्तान आपला मित्र आहे का? लहान भावाला सोबत घेतल्यासच घर समृद्ध होईल, हे मोठ्या भावाला हे समजले असंही अब्दुल्ला म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App