वृत्तसंस्था
बीजिंग – तालिबानची सत्ता असलेल्या अफगाणिस्तानवरील सर्व निर्बंध उठवावेत, असे आवाहन चीनने जगाला केले. जी-२० देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत चीनचे परराष्ट्र मंत्री वँग यी व्हिडिओ लिंकच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ते म्हणाले ‘अफगाणिस्तानला तातडीने मदतीची आवश्य कता आहे.China bats for taliban now
अफगानिस्तानमधील परिस्थिती सुधारण्यासाठी आपण प्रयत्न दुपटीने वाढवावेत. विशेषत:, तेथील जनतेला त्यांच्या या अडचणीच्या काळात मदतीचा हात देणे गरजेचे आहे. चीनने अफगाणिस्तानला तीन कोटी डॉलरची मदत दिली असून त्यात तीस लाख लशींचाही समावेश आहे.
इतर देशांनीही या देशाला मदत करावी. अमेरिकेनेही अफगाणिस्तान सरकारची परकी गंगाजळी त्यांना परत द्यावी. एका अहवालानुसार, अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेची साडे नऊ अब्ज डॉलरची संपत्ती अमेरिकेच्या ताब्यात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App