विशेष प्रतिनिधी
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाण्यासाठी रवाना झालेले असताना एअर इंडिया वन फ्लाईट मधील त्यांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसून येतोय. या फोटोमध्ये माननीय पंतप्रधान कामामध्ये व्यस्त असल्याचे दिसते आहे.
Congress shares counter post after pm modi’s post
या पोस्ट नंतर काँग्रेसने एक काउंटर पोस्ट केली आहे. ज्यात मनमोहन सिंग भारताचे माजी पंतप्रधान विमानात प्रसारमाध्यमांशी चर्चा करतानाची छायाचित्रे शेअर केली आहेत. हे फोटो शेअर करताना काँग्रेसने आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे, “काही छायाचित्रांना कॉपी करणे कठीण आहे.”
Young Brigade of Congress ! मिलींद देवरा ; ज्योतिरादित्य सिंधिया-जितिन प्रसादच अनुकरण करणार का? एक ट्विट-भाजप सरकारचं कौतुक; कॉंग्रेससाठी मोठा धक्का
एकीकडे लोकशाही देशात पंतप्रधान मोदी यांनी आजवर एकही पत्रकार परिषद घेतली नसल्याने काँग्रेसने हा सूचक फोटो शेअर केला आहे. कॉंग्रेसच्या हा जुना फोटो शेअर केल्यामुळे ट्विटरवर मेम्स आणि पोस्ट शेअर करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.
पंतप्रधान मोदी अमेरिकेत तीन दिवसांसाठी जात आहेत. या काळात त्यांचे वेळापत्रक अत्यंत बिझी असणार आहे. क्वाड मीटिंग आणि यूएन जनरल असेंब्लीला संबोधित करणे, प्रमुख अमेरिकन कंपन्यांच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटणे असे अत्यंत महत्वाचे प्रोग्राम त्यांच्या लिस्टमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App