BSE adds 1 crore investor accounts in just 107 days : देशातील प्रमुख शेअर बाजार BSEने 6 जून ते 21 सप्टेंबर या अल्प काळात एक कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली आहेत. यासह गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या केवळ 107 दिवसांत 8 कोटींच्या वर पोहोचली आहे. यापूर्वी 6 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजने म्हटले होते की, त्यांच्या रजिस्टर्ड युजर बेसने 7 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी 23 मेपासून म्हणजे 12 महिन्यांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत, दोन कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली गेली आहेत. BSE adds 1 crore investor accounts in just 107 days to cross 8 crore mark
विशेष प्रतिनिधी
मुंबई : देशातील प्रमुख शेअर बाजार BSEने 6 जून ते 21 सप्टेंबर या अल्प काळात एक कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली आहेत. यासह गुंतवणूकदारांच्या खात्यांची संख्या केवळ 107 दिवसांत 8 कोटींच्या वर पोहोचली आहे. यापूर्वी 6 जून रोजी स्टॉक एक्स्चेंजने म्हटले होते की, त्यांच्या रजिस्टर्ड युजर बेसने 7 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वर्षी 23 मेपासून म्हणजे 12 महिन्यांपेक्षा थोड्या अधिक कालावधीत, दोन कोटी नोंदणीकृत गुंतवणूकदार खाती जोडली गेली आहेत.
या संदर्भात, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आशिष कुमार चौहान म्हणाले की, इक्विटी गुंतवणूक थेट किंवा म्युच्युअल फंडांद्वारे दीड वर्षांपेक्षा जास्त काळात वाढली आहे. जागतिक पातळीवर याची अनेक कारणे आहेत आणि देशांतर्गत बाजारपेठही या ट्रेंडला फॉलो करत आहे.
बाजारात गुंतवणूक करण्याबाबत सावध राहण्याचा सल्लाही त्यांनी दिला. ते म्हणाले की, प्रत्येक गुंतवणूकदारासाठी हे महत्त्वाचे आहे की, गुंतवणूक करण्यापूर्वी त्याच्याकडे कंपनीबद्दल संपूर्ण माहिती असावी आणि ज्या उत्पादनामध्ये तो गुंतवणूक करणार आहे, त्याची संपूर्ण माहिती ठेवावी.
बीएसई बेंचमार्क सेन्सेक्सदेखील अलीकडच्या आठवड्यात झपाट्याने वाढला आहे. मार्च 2020 मध्ये महामारीनंतर, निर्देशांक 110 टक्क्यांहून अधिक वाढला आहे आणि 59,000ची पातळी ओलांडली आहे. 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या तीन सत्रांत सेन्सेक्स 57,000 वरून 58,000 वर गेला आहे आणि 16 सप्टेंबर रोजी आठ दिवसांत 59,000 चा आकडा पार केला आहे. सेन्सेक्सने यावर्षी जानेवारीतच 50,000 चा आकडा पार केला.
यासह भारत आता जगातील सहाव्या क्रमांकाचा सर्वात मोठा शेअर बाजार झाला आहे, भारतीय बाजाराने बाजार भांडवलामध्ये प्रथमच फ्रान्सला मागे टाकले आहे. सेन्सेक्स या वर्षी आतापर्यंत 23.85 टक्क्यांनी म्हणजेच 11,389.83 अंकांनी वाढला आहे. 16 सप्टेंबर रोजी बीएसईमध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल वाढून 3.54 लाख कोटी डॉलर म्हणजेच 260.78 लाख कोटी रुपये झाले.
BSE adds 1 crore investor accounts in just 107 days to cross 8 crore mark
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App