राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे निलंबित १२ आमदार चक्क करणार विधान भवनाबाहेरून मतदान


वृत्तसंस्था

मुंबई : राज्यसभेची पोटनिवडणूक ४ ऑक्टोंबरला होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपचे निलंबित १२ आमदार कसे मतदान करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. पण, केंद्रीय निवडणूक आयोगाने हा तिढा सोडविला आहे. त्यांना विधान भवनाबाहेर स्वतंत्र व्यवस्था करून मतदान करण्याची परवानगी दिली आहे. For the Rajya Sabha by-election, 12 suspended BJP MLAs will cast their votes outside the Vidhan Bhavan; Special Arregment is made for voting

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गोंधळ घातल्याचा कारणावरून भाजपच्या १२ आमदारांना एक वर्षासाठी निलंबित केले होते. त्यात, गिरीश महाजन, जयकुमार रावल, डॉ. संजय कुटे, आशिष शेलार, अतुल भातखळकर, योगेश सागर, हरिश पिंपळे, नारायण कुचे, पराग आळवणी, मितेश भांगडिया, राम सातपुते आणि अभिमन्यू पवार यांचा समावेश आहे.



निलंबित असलेले आमदार विधानभवन परिसरात प्रवेश करू शकत नाहीत. मग, ते मतदान कसे करणार ? , असा प्रश्न निर्माण झाला होता. आता त्यांच्यासाठी विशेष अशी व्यवस्था विधान भवनाबाहेर करण्यात येणार आहे. मतदानाची वेळ इतरांप्रमाणेच सकाळी ९ ते सायंकाळी ४ अशीच आहे. त्यांच्या मतपत्रिका या अन्य मतपत्रिकांसोबत मिसळून मग मतमोजणी होईल.

या १२ आमदारांच्या मतदानाबाबत अधिकाऱ्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचा सल्ला मागितला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने रजनी पाटील यांना तर भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली आहे.

For the Rajya Sabha by-election, 12 suspended BJP MLAs will cast their votes outside the Vidhan Bhavan; Special Arregment is made for voting

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात