विशेष प्रतिनिधी
बीजींग: २० सप्टेंबर रोजी सोमवारी चीनने तीयांगोंग येथील अंतराळ स्थानकावर रसद पोचवण्यासाठी एका कार्गो स्पेसशिप चे प्रक्षेपण केले आहे. हे प्रक्षेपण दुसऱ्या मोहिमेची तयारी करण्याच्या दृष्टीने केले आहे. हॅनॉन मधील “वेन्चांग स्पेसक्राफ्ट लॉंचसेंटर” वरून ‘तियानझोऊ ३’ या कार्गोशिपने उड्डाण केले.
China Spacecraft mission, China launches Tianzhou 3 cargo spaceship from ‘Wenchang spacecraft launch centre’
हे मालवाहतूक अंतराळयान चिनी अंतराळवीर अंतराळ स्थानकावरून पृथ्वीवर आल्यानंतर तीनच दिवसांनी पाठवण्यात आले आहे. “स्वर्गाचे विमान” असा ‘तियानझोऊ’ या चिनी शब्दाचा अर्थ आहे. हे यान जवळपास आठ ते नऊ तास प्रवास करून अंतराळ स्थानकावर पोहोचेल. सदरचे उड्डाण हे तंत्रज्ञान पडताळणीच्या टप्प्यातील पाचवे आहे. ‘तियानझोऊ ३’ मालवाहतूक यानाचे प्रक्षेपण हे अंतराळ स्थानक उभारणी आणि तंत्रज्ञान पडताळणीच्या टप्प्यातील पाचवे आहे. हे यान तीन अंतराळवीरांना सहा महिने पुरेल इतकी रसद, इंधन, साहित्य, उभारणी सामुग्री आणि अतिरिक्त स्पेस सुट घेऊन रवाना झाले आहे.
SpaceX Inspiration4 : तीन दिवस अंतराळात घालवून रचला नवा विक्रम, स्पेसएक्सचे चार हौशी अंतराळवीर पृथ्वीवर परतले
तीन अंतराळवीर सलग नव्वद दिवस स्थानक उभारणी चे काम करून पृथ्वी वर आले. नी हाईशेंग, लियू बोमिंग व टॅंग होंग्बो अशी या अंतराळ वीरांची नावे आहेत. ही चिनची सर्वात प्रदिर्घ अशी मानवयुक्त मोहीम झाली आहे. पुढील महिन्यात ३ अंतराळवीर पाठवण्यात येणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App