नवी दिल्ली – देशात लशींचे उत्पादन वाढल्याने देशात ऑक्टोबर महिन्यांत ३० कोटीहून अधिक डोस उपलब्ध होतील. त्यामुळे भारत लवकरच दुसऱ्या देशांना कोविड प्रतिबंधक लस पाठवण्यास सुरवात करेल, असा विश्वासस केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी व्यक्त केला आहे.100 crore doses will available in next 3 months
काही महिन्यांपूर्वी भारतात लशीची टंचाई झाल्यानंतर परदेशातील लस निर्यातीवर बंदी घालण्यात आली होती.आरोग्य मंत्रालयाने म्हटले की, पुढील तीन महिन्यांत शंभर कोटी डोस उपलब्ध मिळतील. वर्षाच्या चौथ्या तिमाहीत जगभरातील गरजू देशांना लसीची मदत केली जाईल.
सप्टेंबर महिन्यांत भारत सरकारला भारतीय कंपन्यांकडून २६ कोटी डोस मिळाले. देशातील लशीची गरज भागल्यानंतर अतिरिक्त लस ही कोव्हॅक्स कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या देशांना दिली जाईल.जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम देशात वेगाने राबवली जात
असून आपण ११ दिवसात १० कोटी लस दिल्याचे मंडाविया म्हणाले. चार दिवसात दररोज एक कोटीपेक्षा अधिक डोस दिले आहेत. आतापर्यंत ८१ कोटी लोकांना लस देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App