विशेष प्रतिनिधी
मुंबई: २१ जून रोजी बिग बॉस मराठी सिझन ३ ची घोषणा करण्यात आली. तेव्हापासून प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिली होती की हा सिझन कधी सुरू होणार व त्यातील स्पर्धक कोण असणार आहेत. काल १९ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांची उत्सुकता संपली. बिग बॉस ३ चा ग्रँड प्रीमिअर सोहळा पार पडला. यामध्ये अधिकृतरीत्या पंधरा स्पर्धकांची नावे आपल्या समोर आली. ‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेत वकिलाचे पात्र साकारणाऱ्या सोनाली पाटीलचा बिग बॉसच्या घरामध्ये सर्वात आधी प्रवेश झाला. त्यानंतर अभिनेता विशाल निकम आणि कीर्तनकार शिवलिला पाटील त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि सुप्रसिध्द गायक उत्कर्ष शिंदे यांचाही प्रवेश झाला.
Bigg boss marathi season 3 wait is over! know who is participating, Entertainment unlocked!
स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे:
सोनाली पाटील- ५ मे १९८७ साली जन्मलेल्या सोनाली पाटील हिने कॉलेजमध्ये लेक्चरर म्हणून काम केलेले आहे. तिने ‘जुळता जुळता जुळतंय की’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने ‘वैजू नंबर वन’ या टीव्ही शोमध्ये काम केले. त्यानंतर ‘देवमाणूस’ या मालिकेमध्ये तिने साकारलेले पात्र गाजले.
विशाल निकम- विशाल निकम हा एक फिटनेस ट्रेनर आणि चांगला अभिनेता आहे. त्याने २०१८ साली ‘मिथुन’ या मराठी चित्रपटातून पदार्पण केले.
मीरा जगन्नाथ- मीरा जगन्नाथने माझ्या नवऱ्याची ‘बायको’ या मालिकेत संजना नावाचे पात्र साकारले होते. मीराने ‘यू कशी तशी मी नांदायला’ या मालिकेमध्ये मोमो चा रोल प्ले केला होता.
गायक उत्कर्ष शिंदे- डॉ. उत्कर्ष शिंदे हा व्यवसायाने डॉक्टर आहे. सुप्रसिद्ध गायक आणि आनंद शिंदे यांचा तो मुलगा आहे. उत्कर्ष एक उत्तम गायक आणि संगीतकार देखील आहे.
आविष्कार दारव्हेकर- अभिनेता आविष्कार दारव्हेकर यांनी ‘आभाळमाया, ‘या गोजिरवाण्या घरात’ या गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेले आहे.
सुरेखा कुडची- सुरेख कुडची यांनी ९० च्या दशकामध्ये ५० पेक्षा जास्त हिन्दी आणि मराठी चित्रपटातून काम केलेल आहे. त्यांनी मराठी तसेच हिन्दी सिनेमा मध्ये केलेली पात्र चांगलीच लोकप्रिय झाली आहेत.
गायत्री दातार- २७ वर्षीय गायत्री दातार हिने ‘तुला पाहते रे’ या मालिकेमधून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. गायत्री मुळची पुण्याची असून तिचा जन्म मुंबईचा आहे. कॉलेज मध्ये असल्यापासूनच तिला नृत्य आणि अभिनयाची आवड आहे.
स्नेहा वाघ- ऑक्टोबर ४, १९८७ मध्ये जन्मलेल्या स्नेह वाघ वयाच्या १३व्या वर्षांपासून थिएटर मध्ये काम करत आली आहे. ‘काटा रुते कुणाला’ आणि ‘अधुरी एक कहाणी’ ह्या मालिकेमधील तिने साकारलेले रोल चांगलेच गाजले.
कीर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटील- शिवलीला पाटील ही वारकरी संप्रदयातील सुप्रसिद्ध कीर्तनकार आहे.
मीनल शाह- मीनल शाह ‘MTV Roadies rising’ ची सेमी फायनलिस्ट आहे. त्याचबरोबर ती डिजिटल क्रिएटर देखील आहे. सोशल मीडिया वर तिचे हजारो चाहते आहेत.
जय दुधाणे- लोकप्रिय टेलिविजन शो ‘स्प्लिट्सविला’ मधून लाखों तरुणींची मन जिंकणाऱ्या जयला मराठी बिग बॉस मध्ये टास्क करताना बघण्यास सर्व चाहते उत्सुक आहेत.
अक्षय वाघमारे- अभिनेता अक्षय वाघमारे याने फत्तेशीकस्त या मराठी सिनेमामध्ये कोयाजी बांदल हे पात्र उत्तमरीत्या साकारले होते.
विकास पाटील- अनेक मालिका व भूमिकांमधे काम केलेला अभिनेता विकास पाटील बिग बॉस मध्ये सामील झालाय. नुकताच तो कलर्सवर ‘बायको अशी हवी’ या मालिकेत दिसला होता. ‘चार दिवस सासूचे’, ‘कुलवधू, ‘लेक माझी लाडकी’, ‘असंभव’, ‘अंतरपाट’, ‘माझीया माहेरा’ आणि यासारख्या असंख्य मालिकांमधे त्याने अभिनय केला आहे.
संतोष चौधरी (दादूस)- संतोष चौधरी यांना आगरी कोळीगीतातील बादशाह म्हणून ओळखले जाते. ते मराठी बप्पी लहिरी आणि ‘दादूस’ या नावाने प्रसिद्ध आहेत.
अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर हेच यावेळी सीझनचे सूत्रसंचालन करणार आहेत. यावेळी महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार? बिग बॉस स्पर्धकांना कोणते टास्क देणार? याविषयीची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App