विशेष प्रतिनिधी
काबूल – जगभरातील अफगाणिस्तान महिलांनी तालिबानच्या ड्रेसकोड फतव्याविरोधात सोशल मीडियावर #DoNotTouchMyClothes मोहीम सुरू केली आहे. यानुसार अफगाणी महिला पारंपरिक कपड्यांचा पेहराव करून छायाचित्र शेअर करत आहेत. बुरखा न घालता स्वातंत्र्याचा आनंद घेत आहोत, असा महिलांनी या माध्यमांतून तालिबान्यांना संदेश दिला आहे.Womens opposes Talibani dresscode
तत्पूर्वी नव्या तालिबान सरकारच्या उच्च शिक्षण मंत्र्यांनी म्हटले, की देशातील महिला पदव्युत्तर पदवीपर्यंत विद्यापीठात शिक्षण घेऊ शकतात. परंतु त्यांना वर्गात वेगळे बसावे लागेल. तसेच बुरखा घालणे अनिवार्य आहे. डोळे सोडून संपूर्ण शरीर झाकले जाईल, अशा रीतीने महिलांनी बुरख्याचा पेहराव करावा, असे त्यांनी म्हटले होते.
यासंदर्भात गेल्या आठवड्यात विद्यापीठात भरलेल्या एका वर्गाचे छायाचित्र व्हायरल झाले होते. त्यात एका हॉलमध्ये विद्यार्थिनींचा एक गट नखशिखांत काळे कपडे पेहराव केलेला दिसतो आणि त्याचबरोबर तालिबानचा झेंडाही दिसतो.
या फोटोनंतर जगभरातील अफगाणिस्तानच्या महिलांत संतापाची लाट उसळली. परिणामी तालिबानच्या ड्रेसकोडच्या विरोधात ऑनलाइन मोहीम सुरू झाली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App