भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांआधी गुजरातेतील संपूर्ण सरकार बदलले आहे. विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले आहेत. आता संपूर्ण कॅबिनेट बदलण्याची तयारी आहे. Gujarat cabinet will be extended today, cabinet minister will take oath
विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकांआधी गुजरातेतील संपूर्ण सरकार बदलले आहे. विजय रूपाणी यांच्या राजीनाम्यानंतर भूपेंद्र पटेल मुख्यमंत्री बनले आहेत. आता संपूर्ण कॅबिनेट बदलण्याची तयारी आहे.
गुजरातची नवी कॅबिनेट गुरुवारी दुपारी शपथ घेणार आहे. त्यापूर्वी आमदारांना फोन येत आहेत. ज्यांना फोन करण्यात आले आहेत ते मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. आतापर्यंत, कुणाकुणाला फोन आला आहे आणि कोण मंत्री बनू शकतात, यावर एक नजर…
1. मोरबीचे आमदार बृजेश मेरजा
2. राजकोट ईस्टचे आ. अरविंद रैयाणी
3. लिमडीचे आ. किरीट सिंह राणा
4. गणदेवीचे आ. नरेश पटेल
5. सूरत मजुराचे आ. हर्ष सांघवी
6. विसनगरचे आ. ऋषिकेश पटेल
7. ओलपाडचे आ. मुकेश पटेल
8. वडोदरा सिटीच्या आ. मनीषा वाकिल
गुजरातमध्ये यापूर्वी बुधवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे सांगितले जात होते, पण आता संपूर्ण कॅबिनेट बदलले जात आहे. काही आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे वाद होऊ नयेत शपथविधी एक दिवसासाठी टाळण्यात आला होता.
भारतीय जनता पक्षाने नुकतेच आपल्या अनेक राज्यांतील मुख्यमंत्री बदलले आहेत. या सर्व राज्यांत पुढच्या एक वा दोन वर्षांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. यामुळे सरकारच्या विरोधातील वातावरण बदलण्याचा प्रयत्न म्हणून या निर्णयांकडे पाहिले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App